Sharad Pawar Sakal
मराठवाडा

Sharad Pawar : वैजनाथाचे दर्शन अन् ७०० गाड्यांचा ताफा! धनंजय मुंडेना आव्हान देणाऱ्या नेत्याची शरद पवार गटात धडाकेबाज एंट्री

शरद पवार यांच्या सभेत ते पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.

दत्ता लवांडे

बीड : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटाने महाराष्ट्र दौरा आयोजित केला असून आज बीड येथे शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. या स्वाभिमान सभेचा काल टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आज होणाऱ्या सभेत परळीचे पंचायच समितीचे माजी सभापती बबन गिते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, पक्षप्रवेशाआधी बबन गिते यांनी तबब्ल ७०० चारचाकी गाड्यांचा ताफा घेऊन शक्तीप्रदर्शन केलं आहे. वैद्यनाथाचा अभिषेक करून बबन गीते शक्तीप्रदर्शन करत, आपल्यासोबत गाड्यांचा ताफा घेत परळीकडून बीडकडे रवाना झाले आहेत.

धनंजय मुंडे यांना देणार आव्हान

राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवार यांनी बंड केलं आणि आपल्यासोबत काही आमदार घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. यावेळी अजित पवार गटाच्या ९ आमदारांना मंत्रिपद मिळालं. यामध्ये परळीच्या धनंजय मुंडे यांना प्रतिष्ठेचं कृषीमंत्रीपद मिळालं. पण आमदार मुख्य पक्षातून फुटून गेल्यामुळे अनेक कार्यकर्ते संभ्रमात पडले. त्याचबरोबर अजित पवारांनी दोन तीन वेळा शरद पवारांची भेट घेतल्यामुळे हे बंड शरद पवारांच्याच आशिर्वादाने होत असल्याच्या चर्चा झाल्या पण काल पवारांनी स्पष्टीकरण दिलं आणि राष्ट्रवादी भाजपसोबत कधीच जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.

त्यानंतर आता प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन गट पडल्याचं पाहायला मिळत असून धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातही बबन गिते यांच्या रूपाने विरोधक निर्माण झाला आहे. येणाऱ्या काळात परळी मतदार संघाचे आणि धनंजय मुंडे यांचे भवितव्य काय असेल याकडे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT