Osmanabad News 
मराठवाडा

साडे चार एकर शेतात साकारले शरद पवार यांचे चित्र

सकाळ वृत्तसेवा

शिराढोण (जि. उस्मानाबाद) : निपाणी (ता. कळंब) या गावी मंगेश निपाणीकर या शेतकरीपुत्राने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. तब्बल ६०० किलो बियाणे पेरून त्यांनी शेतात शरद पवार यांचे चित्र साकारले आहे. 

मंगेश निपाणीकर यांनी निपाणी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच सुरेश पाटील व शरद पाटील निपाणीकर या दोन भावांच्या साडेचार एकर जमीन क्षेत्रात हरभरा, आळीव, मेथी, ज्वारी, गहू या पिकांपासून ग्रास पेंन्टीगच्या माध्यमातून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे चित्र साकारले आहे.

आपल्या नेत्याबद्दल प्रेम व्यक्त करणारे अनेक कार्यकर्ते आपण पाहिले असतील. पण मंगेशच्या कल्पनेने सगळेच भारावून गेले आहेत. एका राजकीय नेत्याची जगातील सगळ्यात मोठी ग्रास पेंटिंग मंगेशने सातत्याने पंधरा दिवस राबून तयार केली आहे. या पूर्वी मंगेशने छत्रपती शिवाजी महाराजांची अशीच एक ग्रासपेंन्टीग निलंगा (जि. लातूर) येथे २०१८ मध्ये  साकारली होती.

शरद पवार यांना आमंत्रण

ही कलाकृती पाहण्यासाठी व या कलाकाराच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी शरद पवार यांनी आपल्या बांधावर यावे, हीच या शेतकरी पुत्राची व ग्रामस्थांची इच्छा आहे. साहेब आम्ही आपली आतुरतेने वाट पाहतोय, अशी साद या तरुणांनी शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या मार्फत आपल्या लाडक्या नेत्याला साद घातल्याची माहिती माजी सरपंच सुरेश पाटील निपाणीकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT