मराठवाडा

निराधारांना शॉलचे वाटप, थंडीचा कहर 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : वाढत्या थंडीपासून रस्ता, रेल्वेस्थानक व बसस्थानक परिसरातील निराधारांचा बचाव व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या सामाजीक संकुलाकडून शॉलचे वाटप करण्यात आले. जवळपास पन्नास निराधारांना शॉल देऊन समाजात एक स्तुत्य उपक्रम राबविला.

येथील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठांतर्गत सामाजीक संकुल चालते. या संकुलातून एमएसडब्ल्युव बीएसडब्ल्यु असे सामाजीक क्षेत्राशी निगडीत असलेल्या विषयाचे विद्यार्थी शिक्षण घेतात. या संकुलाच्या प्रमुख प्रा. उषा सरोदे ह्या नेहमीच सामाजीक कार्यात अग्रेसर असतात. त्या आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या समाजात कसे मिसळायचे व नाते कसे जुळवायचे याची माहिती सतत देतात. आपला विद्यार्थी समाजात एक चांगला आदर्श निर्माण करणारा व्यक्ती व्हावा ही भावना त्यांची असते. जिल्हा विधा सेवा प्राधीकरणच्या आयोजीत कायदे शिबीरात त्या नेहमी मार्गदर्शन करतात. त्यामुळे त्यांचे कार्य नेहमी चर्चेत असते.

सध्या थंडीचा जोर वाढला आहे. परंतु एवढ्या बोचऱ्या थंडीतसुध्दा अनेकजण आपल्या परिवारापासून दुरावलेले मिळेल तिथे आपले उघड्यावर वास्तव्य कतरतात. विशेषत: रेल्वेस्थानक, बसस्थानक तसेच शहरातील गुरुद्वारा परिसर, उड्डाणपुलांचा आधार घेऊन थंडीत कुडकूडत आपली रात्र घालवितात. त्यांचाही थंडीपासून बचाव व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या सुंकलाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या निराधारांना शॉल वाटप केले. यावेळी प्रा. उषा सरोदे, सुप्रीया तारु, शुभम बैनवाड, बिंदु कनाके आणि सिध्दोधन हिंगोले यांची उपस्थिती होती. या विद्यार्थ्यांचे कुलगरू व अन्य विभागाने कौतूक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT