images (1).jpg 
मराठवाडा

तालुका मुख्यालयी सुरु झाले शिवभोजन

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : लॉकडाऊनच्या काळात गरजू व गरिबांना कमी दरात जेवन मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व सोळा तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी एक या प्रमाणे सोळा ठिकाणी सुरु करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (ता. एक) सहा ठिकाणी सुरु झाले. शहरातही चार एवजी आता सात ठिकाणी शिवभोजन मिळणार आहे.
   
लॉकडाऊन काळात वाढविले ठिकाण
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन देण्याची घोषणा शिवसेनेने निवडणुकीपूर्वी केली होती. यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ही योजना राबविण्याचे ठरविले होते. यासाठी नांदेड शहरात सातशे थाळ्या (जेवण) देण्यात येत आहे. सध्या कोरोना आजाराचा प्रतिबंध रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. या काळात गरजू व गरीब उपाशी राहू नये या साठी ठिकाण वाढविण्यात आले आहेत.

हेही वाचा.... 

शहरातही सात ठिकाणी मिळणार जेवन
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ, रेल्वेस्थानक (प्लॅटफार्म क्रंमाक चार, गोकूळनगर), शासकीय वैद्यकीय रुग्णालयासमोर (विष्णुपुरी) व नवीन मोंढा येथील एसबीआय बॅंकेसमोर असे चार भोजनालय सुरू करण्यात आले. दुपारी बारा ते दोन या वेळात या चार ठिकाणी देण्यात येत आहे. दरम्यान चार ठिकाणचा वाढता प्रतिसाद पाहता शहरात आणखी तीन ठिकाणी शिवभोजन सुरु करण्यात आले आहे. यात देगलूर नाका, तरोडा नाका व श्यामनगर येथील स्त्री रुग्णलयासमोर या ठिकाणचा समावेश आहे.

हेही वाचलेच पाहिजे.... 

सर्व तालुका मुख्यालयी शिवभोजन मिळणार
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने एकवीस दिवसाचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. या काळात तालुकास्तरावर गरीब तसेच गरजू लोकांना जेवन मिळावे, यासाठी प्रशासनाकडून सर्वचा सोळा तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन सुरु करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (ता. एक) भोकर, कंधार, उमरी, किनवट, हदगाव व मुदखेड या सहा ठिकाणी शिवभोजन सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातून मिळाली.  

जेवणात काय मिळणार?
शिवभोजन थाळीत दोन चपाती (प्रत्येकी तीस ग्रॅम), एक वाटी भाजी (शंभर ग्रॅम), एक वाटी वरण (शंभर ग्रॅम) व एक वाटी भात (दीडशे ग्रॅम) असे एकूण चारशे दहा ग्रॅम वजनाचे जेवण गरजू नागरिकांना मिळत आहे. हे जेवण एका वेळी एकदाच घ्यावे लागेल. जेवणाऱ्या लाभार्थींना जेवणाचे दहा रुपये द्यावे लागणार आहेत. तर भोजनालय चालकाला प्रतिथाळी चाळीस रुपये शासन देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Makarand Patil: पालिकेची निवडणूक घड्याळ चिन्हावरच: पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील; वाईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

Rahul Dravid Son: द्रविडचा धाकटा लेक गाजवतोय मैदान; BCCI च्या वनडे स्पर्धेसाठी झाली संघात निवड

Bidri Sugar Factory : शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला यश ,‘बिद्री’ साखर कारखान्याचा उस दराबाबत 'यु टर्न' ३ हजार ६१४ पहिली उचल एकरकमी देणार

Latest Marathi News Live Update : मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

SCROLL FOR NEXT