Shiv Sainiks aggressive Dharashiv seat announce to archana patil mahayuti politics Sakal
मराठवाडा

धाराशिवची जागा राष्ट्रवादीकडे तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक

महायुतीकडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी आरोग्यमंञी प्रा.डाँ.तानाजी सावंत यांचे पुतने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनजंय सावंत यांना डावलुण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चनाताई पाटील यांना जाहीर

नेताजी नलवडे

वाशी : महायुतीकडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी आरोग्यमंञी प्रा.डाँ.तानाजी सावंत यांचे पुतने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनजंय सावंत यांना डावलुण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चनाताई पाटील यांना जाहीर झाल्यानतंर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याकडुन मोठी नाराजी व्यक्त होत,

असुन नाराज झालेल्या तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यानी शनिवार (ता.सहा) रोजी आपल्या पदाचे राजिनामे वरिष्ठाकडे देऊन धाराशिव मतदार संघाच्या उमेदवारी बाबत फेरविचार करुन ही जागा शिवसेनेला घ्यावी किंवा दिलेला उमेदवार बदलून विजयी होणा-या उमेदवाराला उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी आक्रमक झालेल्या पदाधिकारी,कार्यकर्त्यानी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाची नोंदणी केलेल्या जवळपास दोन हजार फॉर्मची होळी करुण आपली नाराजी व्यक्त केली.

लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासुन महायुतीकडुण शिवसेनेचे धनजंय सावंत यांना उमेदवारी मिळेल असा विश्वास पदाधिकारी,कार्यकर्ते व्यक्त करत होते.उमेदवारी मिळणार असल्याचा विश्वास असल्याने अनेक कार्यकर्त्यानी सोशल मिडियाच्या माध्यमातुन प्रचारही सुरु केला होता.माञ महायुतीच्या जागा वाटपात धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली असुन तुळजापुर मतदार संघाचे भाजपाचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुण उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले आहे.

धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानतंर व अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानतंर शनिवारी शहरात तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक झाली.यावेळी आपल्या भावना व्यक्त करत वरिष्ठानी धाराशिवची जागा शिवसेनेला सोडवुण घ्यावी किंवा दिलेला उमेदवार बदलून विजयी होणा-या उमेदवाराला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली.

बैठकीला विधानसभा समन्वयक तथा नगर पंचायतीचे शिवसेनेचे गटनेते नागनाथ नाईकवाडी,तालुकाप्रमुख अँड.सत्यवान गपाट, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले,उपतालुकाप्रमुख विकास तळेकर,शहर प्रमुख सतिश शेरकर,संजय गांधी निराधार योजना कमेटीचे अध्यक्ष रणजीत घुले,सुनिल जाधवर,सुनिल उंदरे,मोहन दळवे,राजेंद्र सुकाळे यांच्यासह तालुक्यातील शिवसेना,युवासेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ''एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा..'' फडणवीसांच्या लोकप्रियतेवरुन केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

Mumbai News: प्रश्न‍पत्रिका तपासणीच्या निकषांमध्ये बदल, शिक्षणात नवीन कार्यपद्धतीचे आदेश; कुणाला लागू होणार?

Eknath Shinde : केंद्राने राज्याला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यादीच वाचून दाखवली

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

Barshi News : बार्शीच्या श्री भगवंत देवस्थानकडून शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा मदतनिधी; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

SCROLL FOR NEXT