Ajit Pawar And Shiv Sena esakal
मराठवाडा

अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध, पदाधिकाऱ्यांना अटक

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजित कार्यक्रमाला विरोध करत आंदोलन करणाऱ्या शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. आज बीड शहरात शहर व बीड मतदारसंघाशी निगडीत विविध १०० कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण पवार यांच्या हस्ते ऑनलाईन होत आहे. राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीत शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस ही दोन पक्ष भाऊ - भाऊ असले तरी जिल्ह्यात व विशेषत: बीड (Beed) मतदारसंघात या दोन पक्षांत विळ्या - भोपळ्याचे सख्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विशेष मंजुरी दिलेल्या कामांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाकडून म्हणजेच राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून आडकाठी आणली जात असल्याचा सचिन मुळूक यांचा आरोप आहे.(Shiv Sena Oppose Deputy Chief Minister Ajit Pawar Programmes In Beed)

त्यामुळे ‘दादा तुमच्या आमदारांना महाविकास आघाडीचा धर्म शिकवा’ असे डिजिटल व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असलेल्या उद्घाटन सोहळ्याचा जाहीर निषेध अशा पोस्ट माजी जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्याकडून व्हायरल केल्या गेल्या. पूर्वी सोमवारी (ता.सात) नियोजित या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम निश्चित होताच सचिन मुळूक यांनी अजित पवार (Ajit Pawar) जिल्ह्यात आले तर त्यांना काळे झेंडे दाखवू किंवा ऑनलाईन असतील तरी दाखवू अशी भूमिका दोनदा जाहीर केली होती. त्यानंतर गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा असल्याने सोमवारचा कार्यक्रम पुढे ढकलून मंगळवारी ठेवला गेला. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी पुन्हा सचिन मुळूक यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे जाहीर केले.

शहर व शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावल्यानंतरही त्यांनी आंदोलन करणारच अशी भूमिका कायम ठेवली. अखेर मंगळवारी सकाळी मुकुक यांच्यासह शुभम डाके, विपुल पिंगळे आदी पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून निषेधाच्या घोषणा दिल्या. शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या विविध विकास कामांचे लोकार्पण पवार ऑनलाईन करणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT