file photo 
मराठवाडा

जय महाराष्ट्र.....! पोलिसांचे फेटे घालून शिवरायांना अभिवादन

गणेश पांडे

परभणी : पोलिस म्हटलं की खाकी वर्दीत कर्तव्यावर हजर असणारा कर्मचारी आपल्या डोळ्यासमोर येतो. परंतू, बुधवारी (ता.१९) शिवजयंतीनिमित्त जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी चक्क केशरी फेटे घालून शिवजयंती सोहळ्याच्या कर्तव्यावर हजर झाले. उंच, बाणेदार व कडक शिस्तीतील हे अधिकारी कर्मचारी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.
पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे चोवीस तास कर्तव्यावर राहणारी शाखा आहे. जिल्ह्यातील कोणत्याही कोपऱ्यात केव्हा ही अनुचित घटना घडली की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आधी तेथे पोहचते. राजकीय सभा असो कि सार्वजनिक सण - उत्सव या शाखेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातत्याने डोळ्यात तेल घालून घटनावर लक्ष ठेवावे लागते. पोलिस वर्दी जरी नसली तरी शिस्तबध्द पोशाखातच या शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना राहावे लागते. त्यामुळे लोकांच्या आनंदसोहळ्यात सहभागी असूनही त्याचा आनंद कधी या कर्मचाऱ्यांना घेता येत नाही. परंंतू, बुधवारी (ता.१९) शहरात साजऱ्या झालेल्या शिवजयंतीच्या सोहळ्यात मात्र, स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी केशरी फेट्यात दृष्टीस पडले. 

२६ जणांचे पथक पुतळा परिसरात कर्तव्यावर  
पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्यासह त्यांच्या ताफ्यातील जवळपास अधिकारी व कर्मचाऱ्याचे २६ जणांचे हे पथक सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात कर्तव्यावर हजर होते. छत्रपतीना अभिवादन करण्यासाठी आलेल्या हजारो नागरिकांच्या गर्दीतही फेटे परिधान करून कर्तव्य बजावणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी उठून दिसत होते. या पथकात पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे, सहायक पोलिस निरीक्षक श्री. मुळे, शरद विपट यांच्यासह  पोलिस कर्मचारी बाळासाहेब तुपसुंदरे, शिवा धुळगुंडे,मधुकर चट्टे, मधुकर पवार,राम घुले,बालाजी रेड्डी, राजेश आगाशे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, सारिका धोत्रे,आशा शेल्लाळे, संतोष व्यवहारे, गणेश कौटकर, श्री. मुंढे, बिक्कड, नरेश शिरसकर आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा - बालिकेवर अत्याचार करुन ठार मारणाऱ्यास फाशीची शिक्षा ...

जिल्ह्यात शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह 
मागील महिनाभरांपासून शहरात शिवजयंती उत्सवाची तयारी सुरु होती. त्यानिमित्त आठ दिवसांपासून शहर भगवेमय झाले आहे. बुधवारी सकाळपासून शिवजयंतीचा उत्साह अभूतपूर्व, असा राहीला आहे. सकाळपासून शहरात भगवे फेटेधारी युवक
दुचाकी, सायकलवरुन पुतळ्याकडे येत होते. सकाळपासून महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी रांग लागली आहे. परभणी शहरातील विविध भागातून महिला आणि पुरुषांनी खास वेषभुषेत प्रभातफेरी काढली. दत्तधाम परिसरातील रहिवाशांनी सकाळी नऊ वाजता दत्तधाम ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अशी चार किलोमिटर अंतराची प्रभातफेरी काढली. यामध्ये महिलांनी मोठा सहभाग घेतला. केशरी रंगाच्या साड्या आणि डोक्यावर भगवे फेटे अशा वेशभुषेत महिला मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. तसेच पुरुषांनी खासवेषभुषा आणि फेटे घालत यात सहबाग घेतला. हातात भगवे झेंडे घेऊन लहान मुलांचाही उत्साह पाहयला मिळाला. त्यासोबतच शिवशक्ती बिल्डींग परिसरातील नागरिकांनीदेखील अशाच प्रकारे प्रभातफेरी काढुन अभिवादन केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT