Shiv Sena, BJP
Shiv Sena, BJP 
मराठवाडा

साडेचार वर्षात दुभंगलेली मने जुळतील का?

गणेश पांडे

परभणी : तब्बल साडेचार वर्ष एकत्र संसार करत असतांनाही एकमेकावर आगपाखड करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेना भाजप या दोन समविचारी पक्षाची सोमवारी परत युती झाली. परंतू परभणी जिल्ह्यात मागील साडेचार वर्षाच्या काळात दुभंगलेली मने या युतीमुळे जुळतील का ?  सत्ता आल्यानंतर जिल्ह्यातील अनेक नेते भाजपवासी झाले, आता त्यांचे काय होणार ? हा प्रश्न भाजप नेत्यांना सतवतोय आहे.

परभणी जिल्हा हा गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी 1989 पासून शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत. परंतू मागील साडेचार वर्षापूर्वी केंद्रासह राज्यात भाजपची सत्ता आल्याने परभणी जिल्ह्यातील कॉग्रेसससह इतर काही पक्षातील नेत्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. यात आमदार मोहन फड, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मेघना साकोरे - बोर्डीकर, आनंद भरोसे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गेल्या लोकसभेसह विधानसभेत शिवसेना - भाजपची युती तुटली होती. दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यामुळे मागील साडेचार वर्षात जिल्ह्यातील अनेकांनी भाजपकडून लोकसभा व विधानसभा निवडणुका लढविण्याचे स्वप्न पाहिले होते. लोकसभा निवडणुकीसाठी परभणी मतदार संघातून भाजपच्यावतीने पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना साकोरे - बोर्डीकर या इच्छुक होत्या. मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह मेघना साकोरे यांनी संपूर्ण मतदार संघात दांडगा जनसंपर्क केला आहे. परंतू आता युती झाल्याने त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. तरी देखील बोर्डीकरांची निवडणुक लढविण्याची प्रबळ इच्छा शक्ती आहे. त्या दृष्टीने ते गेल्या काही दिवसात चाचपणी देखील करीत आहेत. युतीत परभणी लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला आधीपासून आहे. त्यामुळे मेघना साकोरे - बोर्डीकर यांचे पुढे काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.

विधानसभेसाठी देखील पेच
जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाबाबतीतही हीच परिस्थिती होण्याची शक्यता आहे. यापूर्वी युतीच्या जागावाटपात परभणी जिल्ह्यातील परभणी, पाथरी, जिंतूर या तीन जागा शिवसेनेकडे होत्या. तर गंगाखेडची जागा भाजप मित्र पक्षा जायची. पंरतू परभणी व पाथरी वगळता जिंतूर मध्ये शिवसेनेला अद्यापही यश आलेले नाही. गतवेळी परभणी विधानसभा मतदार संघातून कॉग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आनंद भरोसे यांनी भाजपकडून निवडणुक लढविली होती. त्यांना चांगले मते ही मिळाली. पाथरी मधून अपक्ष आमदार मोहन फड यांनी विजयी होताच भाजपला पाठींबा दिला होता. ते मुळचे शिवसेनेचे आहेत. भाजपची सत्ता आल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेशीत झाले. आता आनंद भरोसे व आमदार मोहन फड यांच्यासमोर ही प्रश्न उभा आहे.

शिवसेना भाजप युती होणारच होती. आणि ते गरजेचे होते. हिंदू मतविभाजन टाळण्यासाठी युती आवश्यक होती. निश्चित युतीला यश मिळेल.
- खासदार संजय जाधव, परभणी

जनतेच्या मनात युती व्हावी असे होते, युती झाली. आता जनतेच्या मनातच मी निवडणुक लढवावी असे आहे. जनतेच्या हट्टापायी मला निर्णय घ्यावा लागेल.
- मेघना साकोरे - बोर्डीकर, भाजप नेत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT