Beed Crime News Esakal
मराठवाडा

Beed Crime News: शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला; 8 जणांनी गाडी अडवत केली लोखंडी रॉडने मारहाण

Beed Crime News: बीड येथील शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे बीड येथून म्हाळस जवळा या गावाकडे जात असताना त्यांची गाडी आडवत त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Beed Crime News: बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर प्रणघातक हल्ला करण्यात आला आहे. उपजिल्हाप्रमुखांची गाडी अडवून ७ ते ८ जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. बीड येथील शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे बीड येथून म्हाळस जवळा या गावाकडे जात असताना त्यांची गाडी आडवत त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल सायंकाळी घडली असून हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. खांडे हे नेहमीप्रमाणे बीडहून आपल्या गावाकडे निघालेले असताना बीडपासून जवळच काही अंतरावर त्यांच्या गाडीला काही जणांनी हात केला.

खांडे यांनी गाडी थांबवताच त्यांच्यावर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. त्यांच्यासोबतच्या इतर दोघांनाही मारहाण करण्यात आली असून खांडे हे या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान या हल्ल्या मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली आहे. खांडे यांच्यासोबत असलेल्या इतर दोघांनाही मारहाण करण्यात आली आहे. हे दोघेही या घटनेत जखमी झाले असून, त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT