file photo 
मराठवाडा

धक्कादायक : कोविड सेंटरमध्ये चक्क कोरोना पाँझीटिव्ह रुग्णाने पाण्याच्या बाटलीतून नेली....

संजय कापसे

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या कोरोना पॉझिटिव व्यक्तीने केअर सेंटरमध्ये दाखल होताना दोन लिटर पाण्याच्या बाटलीमध्ये गावठी दारू नेण्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुरुवार (ता. १२)  आपत्ती व्यवस्थापन कायदा व अनाधिकृतपणे दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांना कळमनुरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलींचे निवासी वसतिगृहामध्ये स्थापन करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवण्याकरिता शुक्रवार कळमनुरी येथे आणण्यात आले. यावेळी रुग्णवाहिकेमधून आलेल्या रुग्णांनी आपल्यासोबत असलेले साहित्य केअर सेंटरमध्ये नेण्याचा आग्रह धरला.

पिशवीमध्ये असलेली दोन लिटरची पाण्याची बाटलीत दारु 

कोविड केअर सेंटरच्या परिसरात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी व आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सुरक्षित अंतरावरून या रुग्णांची साहित्य तपासणी केली. कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू आतमध्ये नेण्यास त्यांनी परवानगी दिली. यावेळी एका रुग्णाने त्याच्यासोबत पिशवीमध्ये असलेली दोन लिटरची पाण्याची बाटली आतमध्ये नेण्याचा आग्रह धरला. यावेळी कर्मचाऱ्यांनी इतर साहित्य आतमध्ये नेता येणार नाही असे सांगत त्याला समजावले. मात्र त्यानंतरही संबंधित व्यक्तीने मी बाटली घेतल्याशिवाय आत जाणार नाही अशी भूमिका घेतली. त्यावेळेस संशय आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडून बाटली ताब्यात घेत पाहणी केली.

गावठी दारू बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल

या बाटलीमध्ये दोन लिटर गावठी दारू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केअर सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी या प्रकाराची माहिती कळमनूरी पोलिसांना दिली. पोलीस कर्मचारी रामा करडिले याच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलीस आणि संबंधित व्यक्तीविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा व अनाधिकृतपणे गावठी दारू बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT