file photo 
मराठवाडा

धक्कादायक...थंडपेयात गुंगीचे औषध पाजले ...अन् पुढे...

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शेतावर गेलेल्या एका जीवन विमा निगमच्या (एलआयसी) एजन्टला माझी व पत्नीच्या नावे पॉलीसी काढायची आहे. अशी बतावणी करून या भामट्याने थंडपेयात गुंगीचे औषध पाजून ४४ हजाराचा ऐवज लुटला. हा धक्कादायक प्रकार पांगरी (ता. हदगाव) शिवारात सोमवारी (ता. २३) सायंकाळच्या सुमारास घडला. 

हदगाव तालुक्यातील वडगाव (बु) येथील एलआयसीचे एजन्ट लक्ष्मण कचरु वाठोरे (वय ७०) हे सोमवारी (ता. २३) डिसेंबर रोजी आपल्या पांगरी शिवारातील शेतात गेले होते. त्यांनी काही लोकांच्या पॉलीस काढून बॅगमध्ये रोख २० हजार रुपये घेऊन शेतात थांबले होते. यावेळी त्यांच्या शेतात ग्राहक म्हणून गेलेल्या एका भामट्याने त्यांना फसविले. माझी व माझ्या पत्नीची पॉलीसी काढायची आहे. अशी बतावणी करून या अनोळखीने त्यांना शेतातील रस्त्याच्या कडेला नेले. तेथे नेल्यानंतर त्या भामट्याने आपल्या पीशवीतून आणलेल्या थंडपेयामध्ये (थम्सअप) गुंगीचे औषध टाकून त्यांना पाजविले. त्यानंतर श्री वाठोरे बेहोस केले. 

रोख रक्कमेसह सोने घेऊन भामटा पसार 

त्यानंतर त्यांच्या बॅगमधील रोख २० हजार रुपये व हातातील बोटात असलेल्या दहा ग्राम वजनाच्या दोन अंगठ्या असा ४४ हजाराचा ऐवज घेऊन त्या भामट्याने पोबारा केला. काही वेळाने श्री. वाठोरे हे शुध्दीवर आले. त्याने समोर पाहिले तर कोणीच नाही. मग हा भामटा कोण होता. त्याने बॅग तपासली असता पैसे व हातातील अंगठ्या त्याने लंपास केल्याचे समजले. हे पाहून त्यांना धक्काच बसला. घडलेला प्रकार त्यांनी आपल्या घरी लवकर सांगितला नाही. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजीचा सुर दिसत असल्याने त्यांना विश्‍वासात घेऊन घरच्या लोकांनी विचारले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (ता. २४) त्यांनी तामसा पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. यावरून तामसा पोलिसांनी अनोळखी भामट्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. जगाडे करीत आहेत. 

पोलिसांचे आवाहन 

आपल्या घरी किंवा परिसरात असे भामटे आले तर त्यांच्या आमिषाला किंवा भूलथापांना बळी पडून नका. तसेच अनोळखी व्यक्तीसोबत आपला परिसर सोडून जावू नका. तसेच त्यांच्याकडून कुठलाही अन् पदार्थ खावू नका, ही भामटेगीरी करणारी चोरट्यांची नविन शक्कल आहे. अशा लोकांपासून आपण सावध राहणे हीच काळाची गरज आहे. असे संशयास्पद व्यक्ती आपल्या परिसरात आढळून आल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात येत आहेत. 
नमदेव मद्दे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, तामसा (ता. हदगाव).    

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT