file photo 
मराठवाडा

धक्कादायक : तुरीच्या शेतात गांजा, एटीसी आणि कुरुंदा पोलिसांची कारवाई

राजेश दारव्हेकर

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील उमरा शिवारात दहशतवाद विरोधी पथक व कुरुंदा पोलीस यांनी शनिवारी (ता. १२) रोजी सकाळी ११ वाजता सुमारास शोध मोहिम सुरु केली. उमरा व शिवारातील यामध्ये तीन शेतात गांजाची झाडे आढळून आले असून परिसरात आणखी शेतातील तुरीच्या पिकांची पाहणी केली जात आहे. त्यामुळे गांजाच्या शेतीचा प्रकार या भागात मोठ्या प्रमाणावर सुरु असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील उमरा शिवारातील एका शेतात तुरीच्या ओळीत गांजाची झाडे असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक रामेश्‍वर वैंजने, सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, कुरुंदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरिक्षक सुनिल गोपीनवार,उपनिरीक्षक सविता बोधनकर,श्री पटवे,जमादार रुपेश धाबे, महेश बंडे, अर्जुन पडघन यांच्या पथकाने आज पहाटेच्या सुमारास शेतात पाहणी केली. 

अन्य दोन ठिकाणी गांजाची झाडे आढळून आली

यामध्ये एका शेतात तुरीच्या ओळीमध्ये गांजीची झाडे लावल्याचे आढळून आले. ही गैमाजाची झाडे अंदाजे चार ते साडेचार फुट उंचीची हि झाडे पहायवयास मिळाली पोलिसांनी संबधीत शेतकऱ्यास ताब्यात घेतल्यानंतर परिसरात आणखी काही शेतात झाडे असल्याने त्याने सांगितले. त्यावरून पोलिसांनी आता उमरा शिवार पिंजून काढण्यास सुरवात केली असून याच परीसरात अन्य दोन ठिकाणी गांजाची झाडे आढळून आली आहेत. या प्रकरणात तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची चाैकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.


वीस किलो गांजा असावा असा अंदाज

सध्या उमरा परिसरात किती शेतात गांजाची झाडे आहेत याचा शोध घेतला जात आहे.  जून महिन्यातच तुरीच्या पिकाच्या पेरणीच्या वेळी हि झाडे लावण्यात आली असावीत. या शेतातील झाडे उपटून त्याचे वजन केले जाणार आहे. त्यानंतरच नेमका किती किलो गांजा आहे व त्याची अंदाजे किंमत कळणार आहे. मात्र एका शेतात वीस किलो गांजा असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद होण्याची प्रक्रीया चालु आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT