soygao
soygao 
मराठवाडा

वीज वितरणाच्या कार्यालयाला शॉर्टसर्कीटमुळे आग

सकाळवृत्तसेवा

सोयगाव : येथील वीज वितरणच्या पारेषण विभागाच्या कार्यालयातील 132 वीज केंद्रात अचानक उच्च दाबाच्या वाहिनीमध्ये वीज तारांच्या घर्षणात शॉर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या आगीत वीज साहित्य जळून खाक झाले आहे.

शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत वीज केंद्राच्या तब्बल अर्धा एकर क्षेत्रात आग डोंब उसळल्यान शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान आगीची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. आगीच्या नियंत्रणासाठी टँकर मागविण्यात आले. परंतु पाण्याचा साठाच कमी प्रयत्न अपयशी ठरले होते. या आगीत सुमारे वीज वितरणच्या पारेषण विभागाचे पन्नास हजाराचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

दरम्यान, अग्निशमन यंत्रणा सोयगावला कार्यान्वित नसल्याने मोठा गोंधळ उडाला होता पारेषण विभागाचे उपकार्यकरी अभियंता गणेश पवार घटनास्थळी नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान आग लागताच पारेषण विभागातून तालुकभर वीज उपकेंदराचा वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. अजिंठा सोयगाव जरंडी आदी वीज उपकेंद्रांचा वीज पुरवठा सायंकाळपर्यंत ठप्प करण्यात आला होता. भर उन्हात लागलेल्या आगीचे लोळ उंचच्या उंच दिसत होते. आजीनाथ भोजने, भूषण चौधरी, प्रताप अग्रवाल, विकास शिंदे, विजय निकम, राजू ढगे, विष्णू लाड, पप्पू पाटील, योगेश देवकर आदी कर्मचारी व नागरिकांनी आग दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. परंतु शेवट पर्यंत कोणताही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT