navratri sakal
मराठवाडा

Jalna : मंठ्याचे आराध्य दैवत श्री रेणुका देवी

तालुक्याचे आराध्य दैवत श्री रेणुका देवी येथील देवस्थानात दरवर्षी नवरात्र व चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते

कृष्णा भावसार

मंठा : तालुक्याचे आराध्य दैवत श्री रेणुका देवी आहे. येथील देवस्थानात दरवर्षी नवरात्र व चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. नवरात्रोत्सव काळात या मंदिरात दर्शनासाठी विविध भागातून भाविक येतात. निसर्गरम्य अशा परिसरात लक्ष वेधून घेणारे हे मंदिर आहे.

श्री रेणुका देवीच्या मूळ मंदिराचे काम विटा व चुन्यामध्ये झालेले आहे. मूळ मंदिरात कोणताही बदल न करता नवीन बांधकाम, भव्य सभामंडप, दीपमाळ व रंगरंगोटी भाविकांनी दिलेल्या देणगीतून झाली आहे. येथील देवी मंदिर संस्थानास पर्यटनाचा ड दर्जा मिळाला असून मंदिर परिसरात सिमेंट रस्ते व विकास कामे झाले आहेत.

मंदिरासमोर भक्त जिजाबाईचे मंदिर आहे. मंदिराच्या पश्चिमेला थोड्या अंतरावर डोंगरावर श्री रेणुका देवीचे खूप वर्षांपूर्वीचे छोटे मंदिर आहे. दोन्ही ठिकाणी भाविक दर्शनाकरिता जातात. तसेच डोंगरावर चढताना पायथ्याला गणपती मंदिर, नवीन बांधकाम झालेले श्री अनुसया माता मंदिर आहे. नवरात्रोत्सवात राज्यभरातून आलेल्या भाविकांची दर्शनासाठी परिसरात मांदियाळी जमते. उत्सव काळात येथे दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते.

कसे जायचे

मंठा शहरापासून उत्तरेला अवघ्या एक किलोमीटर अंतरावर श्री रेणुका देवीचे मंदिर आहे. तर जिंतूर-जालना राज्य रस्त्यापासून दोन किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. रेल्वेने यायचे असल्यास मंठा येथे येण्याकरिता परतूर किंवा सेलू स्थानक पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. शहर बसस्थानकातून मंदिरात जाण्याकरिता रिक्षा उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT