सिद्धेश्वर धरण ओव्हरफ्लो sakal
मराठवाडा

Siddheshwar Dam : शेतकऱ्यांची चिंता मिटली! ‘सिद्धेश्वर’चा सांडवा ओव्हरफ्लो; पर्यटकांची रील्स बनवण्यासाठी होतेय गर्दी

सिद्धेश्वर धरण सप्टेंबरच्या सुरवातीलाच पूर्ण भरले. त्यामुळे मागच्या वीस दिवसांत तीन वेळेस धरणाचे दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ : तालुक्यातील सिद्धेश्वर धरण सप्टेंबरच्या सुरवातीलाच पूर्ण भरले. त्यामुळे मागच्या वीस दिवसांत तीन वेळेस धरणाचे दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला. जलाशय शंभर टक्के भरल्यामुळे धरण ओव्हरफ्लो होऊन एक किलोमीटर लांबी असलेल्या जलाशयाच्या सांडव्यावरून निरंतर पाणी वाहू लागले आहे.

सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याचे नयनरम्य दृश्य बघण्यासाठी पर्यटक हळूहळू गर्दी करू लागले आहेत. सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याने धबधब्याचे रूप घेतल्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील पर्यटक आकर्षित होत आहेत. ऑगस्ट अखेरपर्यंत ५० टक्क्यांच्या आत असणारे सिद्धेश्वर सप्टेंबरच्या सुरवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन दिवसांतच तुडुंब भरले.

परिणामी गत वीस दिवसांत तीनवेळा धरणाचे वक्रद्वार उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडवा लागला. सद्यःस्थितीत सिद्धेश्वर जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून दैनंदिन धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकमुळे एक किलोमीटर लांबी असलेल्या जलाशयाच्या सांडव्यावरून निरंतर पाणी वाहत आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

रील्स बनवण्यासाठी होतेय गर्दी

नेहमी नवनवीन रम्य ठिकाणाचा शोध घेऊन सोशल मीडियावर रील्स तयार करणाऱ्यांसाठी हा सांडवा पर्वणी ठरत आहे. सिद्धेश्वर धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद करून रील्स बनविणाऱ्यांची देखील या ठिकाणी गर्दी दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT