Hingoli Siddheshwar Dam Sakal
मराठवाडा

Hingoli Siddheshwar Dam : हिंगोली, वसमत व पूर्णा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर धरणाने गाठला तळ

औंढा तालुक्यातील सिध्देश्वर धरणातून हिंगोली, वसमत व पुर्णा शहराला पाणी पुरवठा केला जातो.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात वाढत्या तापमानाने धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. हिंगोली, वसमत व पूर्णा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील सिध्देश्वर धरणाने तळ गाठला असून जिवंत पाणीसाठा शुन्यावर आला आहे.

औंढा तालुक्यातील सिध्देश्वर धरणातून हिंगोली, वसमत व पुर्णा शहराला पाणी पुरवठा केला जातो. तसेच कालव्याद्वारे ६० हेक्टर सिंचनासाठी या धरणातून पाण्याचे आवर्तन दिले जाते. या धरणातून शेतीसाठी पाण्याचे चार आवर्तन दिले जातात आतापर्यंत दोन वेळा पाणी देण्यात आले आहे. सध्या धरणात १६८.८२६ दलघमी पाणी पातळी आहे. ८०.९६ केवळ पाणीसाठा आहे

तर धरणात जीवंत पाणीसाठा शुन्यावर तर मृत १६५.७९ दलघमी पाणीसाठा असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यात ईसापूर धरणात सध्या ४९.८७ तर येलदरी धरणात २९.७५ टक्के पाणीसाठा आहे. यासह अकरा लघु प्रकल्प जोत्याखाली आले आहेत. १४ प्रकल्पातील पाणीसाठा २३ टक्क्यावर आला आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून तापमान ४२ अंशावर आहे. या वाढलेल्या तापमानाने पाणी पातळी कमालीची घटत चालली आहे. दरम्यान, हिंगोली तालुक्यातील अंधारवाडी व बळसोंड येथे टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.येलदरी धरणातून सिध्देश्वर धरणात पाणीसाठा केला जाणार असल्याची तयारी केली जात असल्याचे अभियंता निसार अहेमद यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

SCROLL FOR NEXT