Sir I want to take a photo along with You
Sir I want to take a photo along with You  
मराठवाडा

...साहेब, मला तुमच्यासोबत फोटो काढायचाय !

माधव इतबारे

औरंगाबाद : दिवाळी असो की दसरा. प्रत्येक सणाला महापालिकेच्या सफाई, पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना पहाटेपासून कामाला लागतात. त्यामुळे यंदा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी बुधवारी (ता. सात) सकाळी सफाई मजूर, पाणीपुरवठा विभागाचे लाइनमन यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. प्रत्येकाची भेट घेऊन त्यांना मिठाईचे वाटपही करण्यात आले. विशेष म्हणजे आयुक्त सहकुटुंब कर्मचाऱ्यांच्या भेटीला गेले होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी हक्काने साहेब मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे, असे म्हणत सेल्फी घेतल्या. 

महापालिका आयुक्त सकाळी सात वाजेपासून रस्त्यावर फिरत होते. रंगीन गेट, नेहरू भवन, भडकल गेट येथील पाण्याची टाकी, समर्थनगर उद्यान, क्रांती चौक पाण्याची टाकी, शहानूर मियॉं दर्गा येथील आठवडी बाजार, सेव्हन हिल, केटली गार्डन, सिडको एन-5 येथील पाण्याची टाकी आणि पंचायत समिती कार्यालय येथे निपुण यांच्यासह त्यांच्या पत्नी निधी व मुलांनी कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप केले. बहुतांश कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सोबत फोटो काढले. काही ठिकाणी आयुक्तांना थांबवून साहेब, मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे, अशा शब्दात विनंती करत कर्मचाऱ्यांनी सेल्फी घेतल्या. 

काम होईल, पण कोणाला पैसे देऊ नका 

यावेळी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या. त्यात 1124 मधील अनेक कर्मचारी कायम झालेले नाहीत. दैनिक वेतनावरील कर्मचाऱ्यांची अशीच अवस्था आहे. त्यांना सेवेत कायम करण्यात यावे, अशी विनंती कर्मचाऱ्यांनी केली. तेव्हा नियमानुसार तुमचे हक्क मिळतील. मात्र, तुमचे काम मी करून देतो, असे म्हणून कोणी तुम्हाला पैसे मागितले तर अजिबात देऊ नका, असा सल्ला डॉ. निपुण यांनी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT