file photo 
मराठवाडा

हिंगोली पालिकेसमोर ठिय्या आंदोलन; काय आहे कारण? वाचायलाच पाहिजे

राजेश दारव्हेकर

हिंगोली :  शहरातील कमलानगर, शाहूनगर या भागातील रस्त्याची वाट लागली असून नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या भागातील रस्त्याची कामे तातडीने हाती घेण्यासाठी या भागातील युवकांनी शुक्रवारी (ता. २२) पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले होते. परंतू उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे यांनी लेखी आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

शहरातील नागसेननगर कमलानगर साईनगर, डॉ. आंबेडकरनगर आदी भागातील रस्त्याची बकाल अवस्था झाल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. यापूर्वी भूमिगत गटार योजनेचे कामे केल्याने रस्त्याची वाट लागली आहे. यापूर्वी देखील रस्त्याची कामे हाती घेण्यासाठी पालिकेला निवेदन देण्यात आले होते. परंतू पालिकेने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने या भागातील युवकांनी शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार या परिसतील शहरातील इतर भागात रस्ते तयार केले जात आहेत, त्याच धर्तीवर या भागात रस्ते तयार करून देण्यात यावेत अशी मागणी केली होती.मात्र वेळोवेळी पालिकेने दुर्लक्ष केल्याने आज नागरिकांनी संताप व्यक्त करीत लोकराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कळासरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिय्या आंदोलन सुरू केले.या ठिय्या आंदोलनात शेकडो युवक सहभागी झाले होते. त्यानंतर पालिकेने रस्त्याची कामे हाती घेतली जातील असे लेखी अश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेतले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT