file photo
file photo 
मराठवाडा

सिध्देश्वर धरणाचे सहा गेट उघडले

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर धरणाचे रविवारी (ता. २०) सकाळी आठ वाजता सहा उघडून पुर्णा नदीपात्रात ३६०३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 

औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर धरणात येलदरी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. या धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसाने येलदरी धरणात पाण्याची आवक सुरु आहे.  हे धरण शंभर टक्के भरल्याने या थरणातून सिध्देश्वर धरणात पाण्याची आवक सुरू आहे. 

३६०३६ क्युसेक पाणी पुर्णा नदीच्या पात्रात

यामुळे सिध्देश्वर धरण देखील शंभर टक्के भरले आहे. यामुळे रविवारी सकाळी आठ वाजता सिध्देश्वर धरणाचे सहा गेट उघडून त्यातून ३६०३६ क्युसेक पाणी पुर्णा नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे नदी काठावरील गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

नदी काठावर असलेल्या गावाना पुर नियंत्रण कक्षातर्फे सतर्कतेचा इशारा

आज सकाळी सिध्देश्वर धरणाचे गेटनंबर दोन, चार,. सहा, नऊ, अकरा, तेरा हे उघडले आहेत. तर गेट नंबर सात व आठ तीन फुटाने उचलून त्यातून पाणी सोडण्यात येत आहे.  यामुळे पुर्णा नदीला पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नदी काठावर असलेल्या गावाना पुर नियंत्रण कक्षातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी आतापर्यंत चार वेळेस या धरणातून पुर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे या भागातील विहीर व विंधन विहिरीची पाणी पातळी कमालीची वाढली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT