Parbhani Job Scam  sakal
मराठवाडा

Parbhani Job Scam : नोकरी लावण्याच्या आमिषाने सहा जणांना गंडा

Parbhani Job Scam : केजमध्ये नोकरीच्या आमिषाने सहा जणांची २८ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी लक्ष्मण वैजनाथआप्पा मुलंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

बीड : नोकरीच्या अमिषाने सहा जणांची २८ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार केजमध्ये समोर आला. याप्रकरणी परभणी जिल्ह्यातील एकावर गुन्हा नोंद करण्यात आला. लक्ष्मण वैजनाथआप्पा मुलंगे (रा. जिंतूर) असे संशयिताचे नाव आहे.

हॉटेल चालक भगवान बिभीषण गाढवे यास त्याच्या परिचयाचे अंकुश दामोदर मोरे (रा. भालगाव, ता. केज) यांची भेट झाली.

त्यांनी मुलाला आरोग्य विभागात सरकारी नोकरी लागावी म्हणून ओळखीचे लक्ष्मण वैजनाथआप्पा मुलंगे यांना दीड लाख रुपये दिल्याचे सांगून तू ही त्यांची भेट घेऊन प्रयत्न कर, असे सांगितले. लक्ष्मणआप्पा मुलंगे याने आरोग्य विभागामध्ये गुप्ता नावाच्या अधिकाऱ्याशी ओळख असल्याची थाप मारली.

सुरवातीला त्यांनी सव्वादोन लाख रुपये दिले. त्यानंतर तो पैसे घेतच राहिला. या प्रकरणात त्याने नंदकुमार उत्तमराव भोसले, संजय अभिमन्यू पुजदेकर, सुशील बालासाहेब मडके, अरुण रावसाहेब ढोबळे, भगवान गाढवे आदींकडून २८ लाख ६५ हजार रुपये उकळले. भगवान गाढवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लक्ष्मणआप्पा वैजनाथआप्पा मुलंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Recruitment: बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा! बीएमसीच्या ९ हजार जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया कधी?

Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update : नेपाळची सार्वत्रिक निवडणूक ५ मार्च रोजी होणार

Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

SCROLL FOR NEXT