3Bhiwandi_202.jpg 
मराठवाडा

भिवंडीच्या इमारत दुर्घटनेत उदगीर तालुक्यातील सहा जणांचा मृत्यू

युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : भिवंडी येथे सोमवारी (ता.२१) पहाटे इमारत कासळून झालेल्या दुर्घटनेत हाळी (ता.उदगीर) येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हाळी गावावर शोककळा पसरली आहे. या सहा जणांवर भिवंडी येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

हाळी येथील शेख कुटूंबातील आरीफ युसूफ शेख हा तरूण पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई येथे आठ वर्षांपूर्वी पत्नी व तीन मुलांसह गेला होता. तो खासगी गाडीवर चालक म्हणून कामाला लागला. त्याचा संसार आनंदात सुरू होता. गावी असलेल्या भावालाही त्याने महिनाभरापूर्वी कामासाठी भिवंडीला बोलावून घेतले. राहण्यासाठी तो भिवंडी येथील जिलानी इमारतीत राहायला होता. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास इमारत कोसळली. त्यात इतर कुटुंबासह जिलानीचे कुटूंब इमारतीच्या ढिगाऱ्यात दबले गेले. यात कुटूंबप्रमुख आरीफ युसूफ शेख (वय-३२), नसीमा आरीफ शेख (२७), निदा आरीफ शेख (१०), सादिया आरीफ शेख (७). हसनैन आरीफ शेख (३), सोहेल युसूफ शेख (२२) यांचा मृत्यू झाला आहे.


सदर घटनेची माहिती मिळताच हाळी गावावर शोककळा पसरली आहे. कुटूंबातील काही सदस्य तात्काळ भिवंडीकडे रवाना झाले. मंगळवारी (ता.२२) पाच वाजेपर्यंत चार जणांचे मृतदेह सापडल्याचे कुटुंबियांनी सांगितले. दरम्यान एकही मृतदेह गावी आणता येत नसल्याने हळहळ व्यक्त होत आहे. युसूफ शेख हे हाळी येथे मजुरी करून उपजीविका भागवायचे. त्याना दोन मुले व दोन मुली होत्या. दोन मुलींचे व एका मुलाचे लग्न झाले होते. मात्र दोन्ही मुले व मुलाचे मुले मृत्यू पावली आहेत. दरम्यान ही माहिती कळतात श्री शेख यांनी भिवंडी गाठली. मात्र तोपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या घटनेमुळे हळी हंडरगुळी गावावर शोककळा पसरली आहे, अशी माहिती हाळीचे रहिवाशी व काँग्रेस समितीचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांनी सांगितले.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT