file photo 
मराठवाडा

हिंगोलीत संचारबंदीच्या सहाव्या दिवशी वाढली गर्दी, जागोजागी भाजीपाल्याचे स्टाॅल 

राजेश दारव्हेकर

हिंगोली :  जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सात दिवसाची संचारबंदी लागु करण्यात आली आहे. संचारबंदीच्या सहाव्या दिवशी शनिवारी (ता. तीन) हिंगोलीकरांचा संयम सुटला असून शहरात ठिकठिकाणी गर्दी दिसत होती. दुचाकी वाहनधारकांची संख्या देखील वाढल्याचे चित्र होते.

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात दुसऱ्यांदा सात दिवसाची संचारबंदी लागु केली आहे. शनिवारी संचारबंदीचा सहावा दिवस होता. या दिवशी सकाळपासून शहरात गर्दी झालेली दिसत होती. रस्त्यावर दुचाकीस्वाराच्या वाहनाची संख्या वाढली होती. 

तसेच शहरात जागोजागी भाजी विक्रेते स्टाँल लाऊन भाज्यांची विक्री करीत होते. जिल्हा परिषद शाळेच्या मैदानाजवळ जिल्हा परिषद कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजी विक्रेते व फळ विक्रेते थांबल्याने येथे खरेदीसाठी गर्दी झाली होती. तसेच पोसँट आँफीस, जवाहर रोड भागात अनेक ठिकाणी भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी दुकाने सुरु होती.

यासह पेन्शनपुरा भागात देखील भाजीपाला विक्रीची दुकाने सुरू होती. यामुळे शहरात ठिकठिकाणी गर्दी दिसत होती. दुचाकीवर फिरणाऱ्या नागरिकांची देखील गर्दी होती. संचारबंदी नंतर चार दिवस रस्त्यावर शुकशुकाट होता मात्र सहाव्या दिवशी रस्त्यावर गर्दी दिसत होती. जिल्हाधिकारी सोशल मीडीयावर नागरिकांना वारंवार संचारबंदीचे नियम पाळा गर्दी करु नका सोशल डिस्टनचे पालन करा, मास्क वापरा असे सांगत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या उपाय योजना गरजेच्या असल्याचे जिल्हाधिकारी सांगत आहेत. परंतु शनिवारी नागरिकांचा संयम सुटल्याचे दिसत होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yuzvendra Chahal Retirement : युझवेंद्र चहलने अचानक घेतली निवृत्ती; पोस्टने खळबळ, म्हणाला, माझ्यात अजूनही क्रिकेट शिल्लक, पण...

Mumbai News: शौचालयातील विषारी वायूमुळे 2 तरुणांचा मृत्यू; गोरेगावातील 'त्या' कारखान्याला टाळे ठोकण्याचे आदेश

2 ऑक्टोबर नाहीतर २३ जुलैचं गूढ; विजय साळगावकरची नवी खेळी, ‘दृश्यम 3’मध्ये पुन्हा रंगला थरार

Vastu Tips: घरात पायऱ्यांची संख्या ५, ८, ११, १४ किंवा १७ अशीच का असते? पायऱ्या बांधताना ही चूक पडू शकते महागात; जाणून घ्या वास्तूचे महत्त्वाचे नियम!

Latest Marathi News Live Update : कॅप्टन स्मित मच्छार यांचा 'अशोक चक्रा'साठी विचार करावा, मिलिंद देवरा यांची पंतप्रधान मोदींना विनंती

SCROLL FOR NEXT