ganpati
ganpati 
मराठवाडा

मुस्लिम एकतेतून जोपासला सामाजिक उपक्रम 

नवनाथ इधाटे

फुलंब्री : फुलंब्री येथिल गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम एकतेचे गेल्या अकरा वर्षांपासून दर्शन घडत आहे. गणेश महासंघाच्या कार्यकारिणीत गेल्या गेल्या वर्षापासून उपाध्यक्ष मुस्लिम समाजाचा तरुण असतो. महासंघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात हिंदू- मुस्लिम व सर्वच जाती धर्माचे पदाधिकारी अग्रेसर असतात. या महासंघाच्या वाटचालीला यंदा अकरा वर्षे पूर्ण झाली आहे.

फुलंब्रीत 2007 मध्ये तालुका गणेश महासंघाची स्थापना करण्यात आली. त्यावर्षी संस्थापक अध्यक्ष म्हणून योगेश मिसाळ यांची निवड करण्यात आली होती. या महासंघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत विविध समजपयोगी कार्यक्रम, मनोरंजन,  महिला- पुरुष सर्वांच्या कलागुणांना वाव देणारा उपक्रम राबविला जातो. तसेच रांगोळी, सायकल स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विजेत्यांचा सत्कार, रक्तदान शिबिरे, तीन उत्कृष्ट गणेश मंडळाची निवड करून त्यांच्या सत्कार करण्यात येतो.

गणेशोत्सवा बरोबरच महालक्ष्मी काळात सजावट चांगली केलेल्या कुटुंबीयांचा महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात येतो. गणेशोत्सव काळात विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात महासंघाचा पुढाकार असतो. या दहा दिवसांच्या काळात शहरात भरगच्च कार्यक्रम राबविले जातात. गेल्या अकरा वर्षांपासून आजही सदरील उपक्रम नित्यनियमप्रमाणे राबविले जाते. तसेच विसर्जनाच्या दिवशी पूर्वसंधेला मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात येत असतो. त्यामुळे फुलंब्रीकर दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करीत असतात.

गणेश महासंघाचा आदर्श
येथील गणेश मंडळे हे गणेश महासंघाच्या अधिपत्याखाली काम करीत असतात. गणेश मंडळाच्या सर्व हालचालीवर महासंघाचे बारकाईने लक्ष असते. गणेश मंडळासमोर पत्ते जुगार रोखण्यातही महासंघाची कठोर भूमिका असते. त्यासाठी गणेश मंडळाची अचानकपणे महासंघातर्फे वेळोवेळी पाहणी करण्यात येते. या महासंघात सर्वधर्मीय तरुणांचा समावेश करण्यात येतो. 

गणेश महासंघाची संकल्पना सुहास शिरसाठांची : योगेश मिसाळ
फुलंब्री येथे गणेश महासंघाची स्थापना करण्याची संकल्पना नगराध्यक्ष सरपंच सुहास शिरसाठ यांची होती. मागील गेल्या पंधरा वर्षपासून सुहास शिरसाठ यांचे फुलंब्री गावावर वर्चस्व असून ते आजही कायम आहे. 2007 मध्ये योगेश मिसाळ याना गणेश महासंघाच्या संस्थापक अध्यक्ष राहण्याचा मान मिळाला होता. त्यानंतर सांडू हापत, राम बनसोड, सुनील शेवाळे, राजेंद्र तांदळे, नितीन मिसाळ, सुमित प्रधान, शाम वानखेडे, विशाल आढाव, यंदा कृष्णा पाथ्रे व यंदा विकास ढोके यांच्याकडे अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष योगेश मिसाळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT