Wh 
मराठवाडा

परभणी जिल्ह्यातील ‘लोअर दुधना’ क्षेत्रात होणार सौरऊर्जा प्रकल्प 

विलास शिंदे

सेलू ः परभणी जिल्हा आणि परिसरातील वीजटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पाची भिंत व धरण क्षेत्रामधील जागेवर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवड्याभरात तांत्रिक क्षमता तपासणीच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे विशेष कार्य अधिकारी राहुल देशपांडे यांनी ‘सकाळ’ला दिली. 

जागा ऊर्जा विभागाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश 
‘लोअर दुधना’क्षेत्रात सौरऊर्जा प्रकल्पाला मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने संबंधित जागा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडून ऊर्जा विभागाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महानिर्मिती कंपनीद्वारे या प्रकल्पाची तांत्रिक क्षमता तपासण्याचे काम येत्या आठवड्याभरापासून सुरू होणार आहे. 

साठ मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प 
‘लोअर दुधना’ क्षेत्रात सुमारे साठ मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प असून, त्याची अंदाजे किंमत चारशे कोटी रुपये आहे. या प्रकल्पाद्वारे सुमारे अडीचशे ते तीनशे स्थानिकांना रोजगार मिळू शकणार आहे. राज्यात धरण क्षेत्रात उभारला जाणारा हा पहिला प्रकल्प असणार आहे. आगामी काळात राज्यातील इतर धरण क्षेत्रांची तांत्रिक योग्यता तपासून असे प्रकल्प उभारणी करण्यात येईल, असे ऊर्जा विभागाने नमूद केले आहे. ऊर्जामंत्र्यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प साकारला जाणार असल्याचे देशपांडे म्हणाले. 

अन्य प्रकल्पांसाठी पाठपुरावा 
टेक्सटाईल पार्क, औद्योगिक वसाहत, नवीन राष्ट्रीय महामार्ग, सेलू शहर भूमिगत गटार योजना आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच मान्यता मिळेल. नियामक मंडळाच्या बैठकीत हे विषय ठेवण्यात येणार असल्याचे राहुल देशपांडे यांनी सांगितले.  

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT