संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

शेतकऱ्याकडून लाच मागितली; बीड जिल्ह्यात तिघा बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा

शिरूर कासार (जि. बीड) -  शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याची घटना गुरुवारी (ता. दोन) दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

तालुक्यातील आनंदगाव येथील एका शेतकऱ्याचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान बँकेत खात्यावर जमा झाले होते. सदरील रक्कम खात्यातून काढून देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी खातेदाराला आठ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार उद्धव विश्वनाथ जायभाये (शाखाधिकारी), बाळू वामन जायभाये (लिपिक), राजेंद्र कारभारी गुजर (शिपाई) यांच्याविरुद्ध शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिस निरीक्षक रवींद्र परदेशी, पोलिस नाईक अमोल बागलाने, सखाराम घोलप, विजय बरकडे, गणेश मेहत्रे यांनी कारवाई केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT