Solider Sagar Todkar 
मराठवाडा

देशसेवेसाठी गेलेल्या उस्मानाबादच्या जवानाचा पंजाबात मृत्यू, कर्तव्यावर असताना दुर्दैवी अपघात

सकाळ वृत्तसेवा

परंडा (जि.उस्मानाबाद) : पंजाबमधील पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना रविवारी (ता.१४) झालेल्या वाहन अपघातात सोनारी (ता. परंडा) येथील जवान सागर पद्माकर तोडकरी (वय ३०) यांचा मृत्यू झाला. देशसेवेची आवड असलेले सागर हे भारतीय सैन्यदलाच्या १५ बटालियनमध्ये कार्यरत होते. पंजाबमधील पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास वाहनास अपघात झाला. त्यात सागर हे जखमी झाले होते.

त्यांना पठाणकोठमधील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.


सागर मेहनती विद्यार्थी होता. त्याच्या बोलण्यात देशाभिमान, प्रेम असायचे. सुटीवर आल्यावर तो तरुणांना देशसेवेचे धडे द्यायचा. आमच्या कॉलेजचा विद्यार्थी असल्याबद्दल अभिमान वाटायचा. त्याचे अचानक जाणे काळजाला चटका लावणारे आहे.
प्रा. शंकर अंकुश, रा. गे. शिंदे महाविद्यालय, परंडा.


सागर हा चांगला मित्र होता. गावातील प्रत्येक कार्यात त्याचा सहभाग असायचा. सुटीवर गावी आल्यावर सगळ्यांशी तो आपुलकीने, आदराने वागायचा. देशसेवा करताना त्याला वीरमरण आल्याचे कळताच दुःख झाले. एक शूर मित्र गमावल्याची सल कायम मनात राहील.
- अमर गाढवे, सोनारी, ता. परंडा.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Crime News : धुळ्याच्या विनोदचे सुरतमध्ये मोठे कांड ! १० हजारांच्या थकीत पगारासाठी मार्केटला लावली आग, १७ दुकाने भस्मसात,२४ कोटींचे नुकसान

Marathi News Live Updates : राज्यात बहुंताश ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune-Bengaluru Highway: लिंब फाट्याच्या उड्डाणपुलावर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; आनेवाडीच्या २९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT