pahni 
मराठवाडा

काही खाजगी डॉक्टरांनी सहकार्याची भूमिका स्विकारली नाही, विभागीय आयुक्तांची खंत...

गणेश पांडे

परभणी ः आपत्तीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना पूर्णतः दिलासा मिळावा या दृष्टीने खुलेआमपणे, व्यापक भूमिका घेवून आप-आपल्या वैद्यकीय सेवा पुरवाव्यात. जे-जे सहकार्य करता येईल त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. कोरोनाविरुध्दच्या या लढाईत काही खाजगी डॉक्टरांनी अद्यापपर्यंत खुलेआमपणे सहकार्याची भूमिका स्विकारलेली नाही अशी खंत आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केली. खाजगी डॉक्टरांनी तत्काळ सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी (ता.११) केले. 

परभणी जिल्ह्यातील कोरोना विषाणु संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी (ता.११) जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व खासगी डॉक्टरांची आढावा बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., निवास उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह शहरातील खासगी डॉक्टरांची उपस्थिती होती. 

असहकार्याची, तटस्थपणाची भूमिका घेऊ नका 
परभणी जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षमपणे काम करणे गरजे आहे. कोरोनाविरुध्दच्या या लढाईत काही खाजगी डॉक्टरांनी अद्यापपर्यंत खुलेआमपणे सहकार्याची भूमिका स्विकारलेली नाही अशी खंत आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केली. खाजगी डॉक्टरांनी तत्काळ सहकार्याची भूमिका घ्यावी. त्या-त्या ठिकाणी सामान्य रुग्णालयासह आरोग्य विभागाबरोबर समन्वयातून काही जबाबदाऱ्या स्विकाराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. आपत्तीच्या काळात असहकार्याची, तटस्थपणाची भूमिका घेऊ नका असे स्पष्टपणे बैठकीत बोलून दाखविले. आपत्तीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना पूर्णतः दिलासा मिळावा या दृष्टीने खुलेआमपणे, व्यापक भूमिका घेवून आपआपल्या वैद्यकीय सेवा पुरवाव्यात. जे जे सहकार्य करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. सरकारी यंत्रणेद्वारे कायद्यानुसार अनेक गोष्टी करता येवू शकतात, याचीही जाणिव ठेवावी, असेही केंद्रेकर यांनी म्हटले. 

अधिकाऱ्यांची खरपट्टी 
जिल्हातील आरोग्य यंत्रणेतील काही बाबीची पुरेशी माहिती या बैठकीत आरोग्य विभागातील अधिकारी सादर करू शकले नाहीत. त्यामुळे यावर संतप्त झालेल्या आयुकांनी अश्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. 

आयुक्तांनी केली ऑक्सीजन प्लॅन्टच्या कामाची पाहणी 
जिल्हा शासकीय रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सीजन प्लॅन्टच्या कामाची पाहणी मंगळवारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केली. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांची या वेळी उपस्थिती होती. श्री.केंद्रेकर यांनी या ठिकाणी सुरु असलेल्या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली. या वेळी त्यांनी काही सूचना देखील केल्या. 

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election: महापालिका निवडणुकीत खेळीमेळी की खेळी? बिनविरोध विजयांमागचं सत्य आयोग शोधणार; अहवाल मागवला, आता चौकशी होणार!

Arjun Tendulkar: अर्जुनचा पुन्हा फ्लॉप शो! गोवा संघाची हार, सूर्यवंशीच्या ८७ चेंडूंत नाबाद ११५ धावांनी गाजवला सामना

Pune News: कुंजीरवाडीच्या माजी सदस्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुटुंब थोडक्यात बचावले, प्रसंगावधान राखल अन् काय घडलं!

Latest Marathi News Live Update : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात बिबट्या जेरबंद

Pune News:...अखेर तीन बछडे आईच्या कुशीत सुखरूप; आंबेगाव तालुक्यातील शेतात आढळली बछडे, बिबट्या मादीचा जीव भेटीसाठी कासावीस!

SCROLL FOR NEXT