मराठवाडा

Crime News : जमिनीच्या कारणावरुन मुलानेच केला वडिलांचा खून

दीपक बारकूल

येरमाळाः जमीन नावावर करत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या पित्याच्या छातीत चाकूने वार करुन वडिलांचा मुलानेच खुन केल्याची घटना (ता.२९) रोजी कळंब तालुक्यातील वडगाव (ज.) येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वडगाव (ज.) (ता.कळंब) येथील दत्तू शाहू पवार व त्यांचा मुलगा जितेंद्र शाहू पवार यांच्यात लहान भावाच्या नावावर दोन एकर जमीन केल्याने दोन एकर पैकी एक एकर माझ्या नावावर करा म्हणून नेहमी भांडणं होत होती. सोमवारी पाच वाजता (ता.२९) मुलगा-वडिलांचं भांडण झालं. मुलगा जितेंद्र याने या भांडणात वडिलांच्या छातीत चाकूने वार केला. आई तारमती दत्तु पवार (वय.५०) भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्यांच्यावरही मुलाने चाकूने वार केला आणि आई, वडिलांनी मला मारले म्हणतं त्यानां जखमी अवस्थेत सोडून सरळ येरमाळा पोलिसठाणे गाठले. तोपर्यंत सदरील प्रकाराची माहिती पोलिसांना गावातून माहिती मिळाल्याने पोलिसांनी वडगाव गाठले होते.

गावातील ग्रामस्थांच्या मदतीने जखमी तारमती पवार,दत्तु पवार यांना पोलिसांनी रुग्णवाहीकेने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. दत्तु शाहू पवार (वय.६०) यांचा उपचारादरम्यान रात्री साडेसात ते आठ दरम्यान मृत्यू झाला. तारामती दत्तु पवार यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असुन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असुन त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांत तक्रार देण्यासाठी आलेल्या जितेंद्र दत्तु पवार याला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आधीच ताब्यात घेतले होते. जितेंद्र दत्तु पवार (वय.३४) याच्यावर लहान भाऊ आकाश दत्तु पवार (वय.२८) याच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा वडिलांचा चाकूने मारहाण करुन खून केल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास सपोनि महेश क्षीरसागर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Bandh : पंतप्रधान मोदींच्या आईबद्दल अपशब्द; एनडीएकडून आज बिहार बंदची हाक, तेजस्वी यादव म्हणाले- भाजपचे नेते जेव्हा...

Pitru Paksha 2025: पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी कोणती दिशा शुभ आणि कोणती अशुभ , वाचा सविस्तर

Teachers Day 2025: यावर्षीचा टीचर्स डे बनवा एकदम खास; तुमच्या आवडत्या शिक्षकांना द्या बजेट-फ्रेंडली पण हृदयस्पर्शी गिफ्ट्स!

IPL to Pay GST: आयपीएलवर लागणार 40 टक्के GST; चाहते आणि आयोजक चिंतेत, तिकिटांच्या किमती किती वाढणार?

MLA Ashutosh Kale : जनतेची अडवणूक केल्यास याद राखा: आमदार आशुतोष काळे; योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवा

SCROLL FOR NEXT