orange sakal
मराठवाडा

Orange : सोनाळ्याच्या संत्र्याला बाहेर राज्यातील बाजारपेठेत मिळतोय भाव

सोनाळा, गाव सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी संत्रा बेल्ट म्हणून ओळखला जात आहे. या परिसरात मुबलक संत्रा उत्पादन घेतले जात आहे.

पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर - तालुक्यातील सोनाळा येथील अभिता ऍग्रो इंडस्ट्रीजच्या संत्रा प्रक्रिया उद्योगाद्वारे आठ दिवसांत तब्बल १५ ट्रक संत्र्यांवर प्रक्रिया करण्यात आली. ब्रशिंग केल्यामुळे संत्र्याची चमक वाढली आहे. हैद्राबाद, केरळ, मुंबई, बंगळुरू येथील बाजारपेठेत संत्र्याला मागणी मिळत आहे. चांगला भाव मिळाल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सोनाळा, गाव सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी संत्रा बेल्ट म्हणून ओळखला जात आहे. या परिसरात मुबलक संत्रा उत्पादन घेतले जात आहे. मात्र आता पर्यत संत्र्यावर प्रक्रिया करणारा एकही उद्योग नव्हता. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नागपूर, अमरावती, मोर्शी असा लांबपल्ला गाठावा लागायचा.

या भागात संत्रा प्रक्रिया उद्योग सुरु झाला पाहिजे अशी येथील शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी होती. नेमक्या या बाबीचा विचार करुन अभिता ऍग्रो इंडस्ट्रीजचे सीईओ सुनील शेळके यांनी १० मार्च रोजी सोनाळा येथे संत्रा प्रक्रिया उद्योग सुरु केला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे.

शेतकऱ्यांनी आणलेल्या संत्र्यावर विविध प्रकारची प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर पॅकिंग केलेला संत्रा देशातील नामांकित बाजारपेठेत पोहचवला जातो. अभिता ऍग्रो इंडस्ट्रीजने 'सोनाळा संत्री' या नावाने संत्र्याचा नवा ब्रँड तयार केला आहे. भविष्यात हा ब्रँड जागतिक बाजारपेठेत पोहचवण्यात येणार आहे. नामांकित विदेशी कंपन्यांसोबत अभिता ऍग्रो इंडस्ट्रीजचा करार झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT