PBN24KCP01 
मराठवाडा

परभणीहून फोन येताच तत्काळ मदतीला धावले खासदार डॉ.कोल्हे 

कैलास चव्हाण

परभणी ः लॉकडाउनमध्ये देवाची आळंदी येथे अडकलेल्या परभणी जिल्ह्यातील ५० कामगार कुटूंब अडकले असून त्यांना अन्नधान्याची गरज आहे, असा संदेश परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना कळवताच डॉ.कोल्हे यांच्या जगदंब प्रतिष्ठाणने तत्काळ अन्नधान्य देत मदत केली आहे.
   
परभणी जिल्ह्यातील बहुतांष नागरिक पुणे जिल्ह्यात कामानिमित्त स्थायिक आहेत. लॉकडाउनपुर्वी काही लोक परतले. परंतु, जे अडकले आहे त्यांची आता परवड सुरु झाली आहे. बहुतांष लोक हे पुणे आणि परिसरात असणाऱ्या विविध कंपन्यात कामाला आहेत. घरात असलेले अन्नधान्य संपले आणि गावाकडे परतीचा मार्ग बंद झाल्याने आता उपासमार होत आहे. जमा असलेली पुंजी देखील संपली. बाहेर संचारबंदी त्यामुळे या मजुर कुटूंबाचे हाल सुरु झाले आहेत. 

राजेश विटेकर यांनी केला डॉ.कोल्हे यांना फोन  
एका कुटूंबाने परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांना मोबाईलवर संपर्क साधुन व्यथा सांगितली. त्यामुळे तत्काळ विटेकर यांनी ही बाब शिरुरचे खासदार आणि अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांच्या कानावर घातली. त्याची डॉ.कोल्हे यांनी तत्काळ दखल घेत आपल्या जगदंब प्रतिष्ठाणच्या माध्यमातून मदत केली. त्यांनी गहू, तांदूळ आणि किराना साहित्याच्या किट आळंदीकडे रवाना केल्या. प्रतिष्ठाणचे डॉ. शैलेश मोहीते पाटील यांनी स्वत:त्या परभणी जिल्ह्यातील गरजु कुटूंबाना अन्नधान्य व किराणा साहित्य पोचते केले. यासाठी स्थानिक राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांही पुढाकार घेतला.

चाकण, मावळ भागात अडकले नागरिक 
पुणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने परभणी जिल्ह्यातील नागरिक अडकलेले आहेत. चाकण, मावळ आदी भागात रोजगारासाठी गेलेले अडकुन पडले असून आळंदी येथे मदत झाल्याचे कळताच अन्य भागातून देखील मदतीसाठी राजेश विटेकर यांच्याकडे संपर्क होत आहे. श्री. विटेकर हे त्या-त्या भागातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधत आहेत.

सुरतमध्ये अडकले ३७ कुटूंब
गुजरातमधील सुरत येथे जिल्ह्यातील ३७ कुटूंब कामानिमीत्त गेले होते. सध्या ते तेथे अडकुन पडले असून जवळ असलेले अन्नधान्य संपले असून त्यांनाही राजेश विटेकर यांच्याशी संपर्क साधला असून विटेकर यांनी त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT