Sowing on only hundred millimeters of rainfall sakal
मराठवाडा

शंभर मिलिमीटर पाऊस झाल्यावरच करा पेरणी

कृषी विभागाचा सल्ला, हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ५४ मिमी पाऊस

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५४ मिमी सरासरी पाऊस झाला. तो पेरणीयोग्य नाही. किमान शंभर मिमी पाऊस होईपर्यंत व जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओल उपलब्ध होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मृग नक्षत्रात पेरणी व्हावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा असते. पण, अजूनही जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. जिल्‍ह्यातील काही भागात थोड्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या चोहीकडे पेरणीची लगबग सुरू आहे. शेतकरी जमिनीची पूर्व मशागत करून ती पेरणी योग्य करताना दिसत आहे. पण, यावर्षी तापमान जास्त असल्याने शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पीक पेरणीची जोखीम शेतकऱ्यांनी घेऊ नये. तीन सेमी. ओल जमिनीत गेल्याशिवाय पिकांची लागवड करू नये, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

जिल्ह्यासाठी ५५ हजार ४०३ मेट्रीक टन खत

खरीप हंगाम २०२२ मध्ये प्रस्तावित तीन लाख ५३ हजार ६२४ हेक्टर पेरणी क्षेत्रासाठी आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकूण ५५ हजार ४०३ मेट्रीक टन खते उपलब्ध झाली आहेत. त्यापैकी ३० हजार ४१ मेट्रीक टन खतांची विक्री झाली. आजघडीला जिल्ह्यात २५ हजार ३६१ मेट्रीक टन खतांचा साठा शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी केवळ डीएपी खताची मागणी करू नये त्यातही विशिष्ट उत्पादकाच्या डीएपीसाठी आग्रह धरू, नये असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

सोयाबीनसाठी वापरा एनपीकेएस ग्रेड खत

वास्तविक पाहता सर्व कंपन्यांच्या डीएपीमध्ये १८ टक्के नत्र व ४६ टक्के स्फूरद हेच घटक उपलब्ध असतात. सोयाबीन पिकासाठी एनपीकेएस २० : २० : ०० : १३ या ग्रेडचे खत अतिशय उपयुक्त आहे; कारण त्यामध्ये सोयाबीन बियाणांमध्ये तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक असलेले सल्फर १३ टक्के आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपीऐवजी एनपीकेएस या ग्रेडच्या खताचा सोयाबीनसाठी वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT