soyabean prices soyabean prices
मराठवाडा

इतिहासात पहिल्यांदाच सोयाबीनला दहा हजारांचा भाव

सोयाबीनच्या भावाचा घडला इतिहास; तेल मात्र स्थिर

हरि तुगावकर

लातूर: soyabean highest price: लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोबायीनच्या भावात कमालीची तेजी राहिली आहे. मंगळवारी (ता. २७) सौद्यात सोयाबीनला नऊ हजार ८५१ रुपये कमाल भाव मिळाला. तर शहरातील तेल उत्पादक कंपन्यांनी मात्र दहा हजार रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली आहे. सोयाबीनच्या इतिहासात पहिल्यांदा दहा हजाराचा भाव मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेंडीची मागणी, वायदे बाजारात होणारे व्यवहार, त्यात कमी असलेली आवक या सर्वाचा परिणाम सोबायीनचे भाव वाढण्यात होत आहे.

लातूर हे सोयाबीनचे आगार बनत आहे. हंगामात तर दररोज साठ ते सत्तर हजार क्विंटल सोयाबीनची आवक येथील बाजारपेठेत राहत आहे. सोयाबीनच्या पेरणीच्या क्षेत्रातही सातत्याने वाढ होत आहे. पण गेली अनेक वर्षापासून सोयाबीनला सरासरी चार ते साडे चार हजार रुपये भाव राहिला होता. सोयाबीनाला सहा हजार रुपये भाव मिळावा म्हणून आंदोलनही झाली. पण सहा हजारापेक्षा भाव मात्र कधी वाढले नाहीत. पण या वर्षी कोरोनाच्या संकट काळात सुरवातीपासूनच सोयाबीनच्या भावात तेजी राहिली आहे.

येथील आडत बाजारात आक्टोबरमध्ये सोयाबीनला कमाल भाव चार हजार १९० रुपये राहिला होता. त्यानंतर प्रत्येक महिन्यात त्यात सातत्याने वाढ होत गेली आहे. फेब्रुवारीमध्ये पाच हजाराचा टप्पा पार झाला. मार्चमध्ये सहा हजारापर्यंत सोयाबीन गेले. एप्रिलपासून सोयाबीनच्या भावात कधीच मंदी आली नाही. साडे सात हजार, आठ हजार असे भाव वाढत गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT