Shortage of soybean seeds during kharif season 
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा, दरात मोठी वाढ

तानाजी जाधववर

खरीप पेरणीचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू आहे. खरीप हंगामाच्या ऐन तोंडावर बियाण्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली होती. त्याचवेळी देशातून केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठविल्याने सरकारने ही वाढ मागे घेतली.

उस्मानाबाद : एका बाजुला सरकारने महाबीजच्या बियाण्याचा (Mahabeej) दर कमी केला. पण दुसरीकडे लगेचच त्याचा साठा कमी झाल्याचे उलट चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांचा (Soybean Seeds Shortage) मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. तर खासगी कंपनीच्या बियाण्यांच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने शेतकऱ्यांवर (Farmer) अधिकचे पैसे देऊन बियाणे खरेदी करण्याची वेळ आली आहे. सरकारने शेतकऱ्यांची अशी फसवणुक केल्याने शेतकरी संतप्त झाला असुन दर कमी करण्याचा निर्णय घ्यायचा पण बाजारात ते बियाणेच अत्यल्प येत असेल तर शेतकऱ्यांनी कोणाकडे पाहायचे असा सवाल आता शेतकरी करित आहेत. खरीप पेरणीचा हंगाम (Kharip Season) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू आहे. खरीप हंगामाच्या ऐन तोंडावर बियाण्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली होती. त्याचवेळी देशातून केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठविल्याने सरकारने ही वाढ मागे घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांना पुढील संकाटचा अंदाज आला नव्हता. मात्र ते संकट ऐन बियाण्याची खरेदी करताना समोर आल्याने शेतकरी हतबल झाला आहे. महाबीजच्या बियाण्याचे दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय जरी शासनाने घेतला असला तरी बाजारात बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. खरच तुटवडा आहे की, कृत्रिम टंचाई भासविली जात आहे. (Soybean Seeds Shortage In Large In Osmanabad District)

Mahabeej

यावर शेतकऱ्यांतून शंका व्यक्त होत आहे. यावर्षी बियाण्याच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्याने शेतकऱ्यांनी महामंडळाच्या महाबीजच्या सोयाबीन बियाणे खरेदीसाठी गर्दी केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत महाबीजच्या बियाण्याचे उत्पादन कमी असल्याने महाबीज बियाणे मिळत नसल्याचे कारण दिले जात आहे. सध्या शेतकरी बाजारात सोयाबीन बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे. जिल्ह्यामध्ये महाबीजचे बियाणेच कुठेच मिळत नसल्याने शेतकरी त्यासाठी धावाधव करताना दिसत आहे. पेरणीचा काळ जसा जवळ येत आहे. तसा शेतकऱ्यांना इतर बियाण्याची खरेदी करावी लागणार असे चित्र आहे.

farmer

यंदा खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांच्या दारात मोठी वाढ झाली आहे. तुलनेत महाबीज बियाणांचे दर कमी आहेत. शेतकरी महाबीज बियाणे खरेदीला प्राधान्य देत आहेत. बाजारात महाबीज बियाणांचा स्टॉक शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांना खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदी करावे लागत आहेत. कंपनीला पैसे भरुनही ते मिळत नाही. आता तर बियाणे मिळणेच कठिण असल्याचे सांगितले आहे.

गणेश जाधव, चालक, कृषी सेवा केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT