mudhkhed.jpg
mudhkhed.jpg 
मराठवाडा

विशेष पोलिस महानिरीक्षकही उतरले मैदानावर

गंगाधर डांगे


मुदखेड, (जि. नांदेड) ः केंद्रीय पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयाचे विशेष पोलिस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांच्या संकल्पना व पुढाकारातून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणातील मैदानावर पत्रकार व केंद्रीय पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयातील जवानांत गुरुवारी (ता. ३०) क्रिकेटचा रोमहर्षक सामना रंगला. या सामन्यामध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक राकेश कुमार यादव आपल्या क्रिकेटच्या ‘टीम’सह मैदानावर उतरले होते. पोलिस दलाच्या टीमचे कप्तान म्हणून राकेश कुमार यादव यांनी जबाबदारी सांभाळली, तर पत्रकारांच्या टीमचे कप्तान म्हणून डांगे यांनी काम पाहिले.

‘सीआरपीएफ’चा संघ विजयी
केंद्रीय राखीव पोलिस दल हे देशाच्या संंक्षणासाठी महत्त्वाची कामगिरी बजावते. या दलाच्या कामकाजाची माहिती माध्यमांच्या माध्यमातून पुढे यावी आणि केंद्रीय पोलिस दल व पत्रकार यांच्यात समन्वय असावा, या उद्देशाने क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. मैदानी खेळांमधून निरोगी स्पर्धेची भावना निर्माण होते, असे या वेळी विशेष पोलिस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांनी संगितले. मैदानी खेळ खेळतांना समूहाने एकमेकांबरोबर समजुतीने खेळावे लागते. विविध खेळ खेळण्यातून सामाजिक विकास होतो. त्यातून निरोगी स्पर्धेची भावना, खेळाडूवृत्ती निर्माण होते आणि मनोरंजन, विचारशक्ती, कल्पनाशक्ती यास नवी उभारी मिळण्याबरोबर खेळाडूंचा शारीरिक विकास होतो, असे प्रतिपादन यानिमित्ताने बोलताना विशेष पोलिस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांनी केले. १५ षटकांच्या या रंगतदार क्रिकेट सामन्याला प्रेक्षक म्हणून उपस्थित दोन हजार जवान, प्रशिक्षणार्थी, कर्मचारी यांनी सामन्याचा आनंद घेतला. या वेळी ३७ धानांनी ‘सीआरपीएफ’चा संघ विजयी झाला.

हेही वाचा - ​ सापडलेल्या पैशातून ग्रंथभेट
या सामन्यात कमाण्डेन्ट बी. वीर राजू, उपकमाण्डेन्ट पुरोषोत्तम जोशी, कपिल बेनिवाल, सहायक कमांडेण्ट जगन्नाथ उपाध्याय, रुपेश कुमार, कमाण्डेन्ट रंजित गोडसे, प्रवीण पाटील, के. सिंह, पोलिस निरीक्षक सत्यवीर, शुक्ला, ए. एस. आय. वत्सय यांनी सहभाग घेतला होता. पत्रकारांतर्फे देवानंद गुंजाळ, दिनेश शर्मा, संदीप मोडवान, ऋषिकेश बेंबरे, विनोद चंद्रे, अनिल आंबरखाने, फैजान- ए- रजा, इमरान, जुनेद, माधव गाडेकर यांनी सहभाग घेतला होता. क्रिकेटचा खेळ देशाच्या जवानांसोबत खेळण्याची संधी मिळाली, याचा आपणास मनस्वी आनंद होत असल्याची भावना पत्रकारांनी या वेळी बोलतांना व्यक्त केली.


या वेळी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. दिनेश कुमार मिश्रा, उपकमाण्डेन्ट पुरुषोत्तम राजगडकर, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सहसचिव संजय कोलते, ज्येष्ठ पत्रकार मनोज कमटे, ईश्वर पिन्नलवार, रुक्माजी शिंदे, उत्तम हणमंते, प्रल्हाद मस्के, अतिख अहमद, आशीष कल्याणे, साहेबराव हौसरे, साहेबराव गागलवाड, सिद्धार्थ चौदंते आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

Udayanraje Bhosale : यशवंतराव चव्‍हाण यांना भारतरत्‍न द्या ; उदयनराजे, कऱ्हाडच्या सभेत मोदींना देणार निवेदन

MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

SCROLL FOR NEXT