file photo 
मराठवाडा

वाळू उपशावर छापा; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

जगदीश जोगदंड

पूर्णा (जि.परभणी) : अवैध वाळू उपशावर स्थानिक पोलिस व महसूल प्रशासन डोळेझाक करीत असल्याने अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने रविवारी (ता. दहा) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सुकी- पिंपळगाव (बाळापूर ) येथे कारवाई केली.
पूर्णा नदीपात्रात या विशेष पथकाने छापेमारी करून चार वाहनांसह तीन जणांना ताब्यात घेतले असून तीस ब्रास वाळू, साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुकी- पिंपळगाव (बाळापूर) शिवारातील पूर्णा नदीपात्रात या विशेष पथकातील सहायक पोलिस निरीक्षक हणमंत पांचाळ, सहायक फौजदार हनुमान कच्छवे, सखाराम टेकूळे, जगदीश रेड्डी, अतुल कांदे, श्रीकांत घनसावंत, गजेंद्र चव्हाण, पूजा भोरगे यांनी छापा टाकला. या नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा करणारे ट्रक्टर (एमएच २२ -एच ५९४८) व महिद्रा कंपनीचे लाल रंगाचे विनानंबरचे असे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह, तर (एमएच २२- एजी ५६०३) दुचाकी व एक एच. एफ डिलक्स कंपनीची जुनी वापराची काळ्या रंगाची दुसरी दुचाकी व पाच मोबाइलसह तीन जणांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. तीस ब्रास वाळू व सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पूर्णा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

नऊ आरोपींविरोधात गुन्हा
 घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेली ३० ब्रास वाळू महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. याप्रकरणी किशोर कवठेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नऊ आरोपींविरोधात गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :​ ‘मोक्का’तील आरोपी पोलिसांच्या ताब्यात
वाहतुकीकडे दुर्लक्ष का ?
या घटनेमुळे स्थानिक पूर्णा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. लॉकडाउन काळात रुग्णास रुग्णालयात घेऊन जाणारी दुचाकी, शेतात जाणाऱ्या-येणाऱ्या शेतकऱ्यांची दुचाकी, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दुचाक्या पकडण्यात तत्परता दाखविणारे व त्या वाहनांना दोन हजार रुपयांचा दंड आकारणारे पूर्णा पोलिस या वाळूच्या वाहतुकीकडे का दुर्लक्ष करत आहेत, असा प्रश्न जनतेला पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs NZ: पाकड्यांशी भिडायला किवींनी संघात १, २ नव्हे तर ३ बदल केले, पण पावसाने सगळे गणितच बिघडवले! आता पुढचे समीकरण काय?

Pune Traffic : सायलेन्सर व ड्रिंक ॲण्ड ड्राईव्हविरोधात वाहतूक शाखेची कारवाई; ३४८ बुलेटस्वरांकडून तीन लाख ३४ हजार रुपयांचा दंड वसूल

Trump Tariff: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डोनाल्ड ट्रम्प भारताकडून किती टॅरिफ आकारणार? हा कर फक्त १५० दिवसांसाठी का लादला?

२०२४ ला डेटिंगची चर्चा, २०२५ मध्ये नातं जगजाहीर; आता शिखर धवनने आयरिश प्रेयसीसोबत लग्न केलं, सोफी शाइन आहे तरी कोण? पाहा फोटो

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; तासन् तास उशिरा धावतात पॅसेंजर गाड्या; प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण

SCROLL FOR NEXT