file photo 
मराठवाडा

Video: रस्त्यावर उतरून सेवा देणारा हरहुन्नरी क्रीडा शिक्षक

सकाळ वृत्तसेवा

परभणी : कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पोलिस प्रशासन जोखीम पत्करून रात्रंदिवस सेवा देत आहेत. त्यांच्यासोबतच येथील क्रीडा शिक्षक सुशील देशमुख हेदेखील एक महिन्यापासून रस्त्यावर उतरून शहर वाहतूक शाखेला सहकार्य करीत निष्काम सेवा देत आहेत.

येथील सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूल येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सुशील देशमुख हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व. कुठल्याही क्षेत्रात पुढाकार घेऊन व स्वतःला झोकून देऊन काम करण्याची त्यांची वृत्ती. याच सेवाभावातून ते महाराष्ट्र वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संस्था नागपूर या संस्थेचे सदस्य झाले. सध्या ते या संस्थेचे जिल्हा समादेशक म्हणून कार्यरत आहेत. जेव्हा राज्यासह देशात कोरोनाचा फैलाव होऊ लागला. कोरोनाने दहशत निर्माण केली.

 कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम
नागरिकांमध्येदेखील भीती निर्माण झाली. प्रशासन हातगाईवर आले. अशा वेळी आपणही शहराचे, समाजाचे देणे लागतो. अशा परिस्थितीत आपल्याकडून सेवा घडावी म्हणून स्वतः काम करण्याची तयारी ठेवली. ता. २० मार्च रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची भेट घेऊन शहरातील वाहतूक व्यवस्थेला सुरळीत करण्यासाठी सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून ते शहर वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्यासोबत राहून ते दररोज आठ ते दहा तास शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य करीत आहेत. एकीकडे बहुतांश शिक्षक घरातच क्वारंटाइन झालेले असताना हा हरहुन्नरी, अवलिया क्रीडा शिक्षक मात्र हातात काठी घेऊन रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी झटत असल्याचे चित्र आहे.

समाजासाठी केले पाहिजे 
आपल्या हातून समाजाची सेवा घडावी ही आई-वडिलांची शिकवण. देश, राज्य, जिल्हा संकटात असताना आपण घरी बसून पाहणे, त्यावर चर्चा करणे योग्य नाही असे वाटल्यामुळे आपणही काही तरी समाजासाठी केले पाहिजे या भावनेने शहरात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत आहे.
- सुशील देशमुख, जिल्हा समादेशक, आरएसपी, परभणी.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert Maharashtra : कोकणासह सातारा, सांगली, कोल्हापुरात अतिमुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज, मॉन्सूनचे ढग आणखी तीव्र

Belhekarwadi farmers: राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे प्रकल्पावरून संघर्ष तीव्र; अधिकाऱ्यांच्या वाहनांना घेराव, रेल्वे भूसंपादनाविरोधात बेल्हेकरवाडीत संतापाचा उद्रेक

Beed: गाय-म्हैस नाही, तरीही दुधाचा महापूर कसा? ; आष्टी तालुक्यात दुधाच्या नावे पसरतेय ‘पांढरे विष’; भेसळमाफिया मोकाटच

Beed: ट्रक उलटला; परळी-गंगाखेड वाहतूक खोळंबली

"दिग्दर्शकाने रिडींगला बोलावलं आणि सेटवर कुणीच नव्हतं" अभिनेत्रीने सांगितला पहिल्या सिनेमाचा भयानक अनुभव

SCROLL FOR NEXT