लातूर लातूर
मराठवाडा

लातुरात डेंगीचे थैमान! प्रशासनाकडून उपाययोजना सुरू

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्येत लक्षणीय घट होत आहे. त्यामुळे व्यवहार आता सुरळीत सुरु झाले आहेत. असे असताना आता लातूरकरांना डेंगीचा सामना करावा लागत आहे

सकाळ वृत्तसेवा

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्येत लक्षणीय घट होत आहे. त्यामुळे व्यवहार आता सुरळीत सुरु झाले आहेत. असे असताना आता लातूरकरांना डेंगीचा सामना करावा लागत आहे

लातूर: कोरोनाचा कहर थोडासा कमी होत असतानाच आता डेंगीने थैमान घातले आहे. शासकीय सोबतच खासगी रुग्णालयात या रोगाचे रुग्ण वाढू लागले आहेत. शहरासोबतच जिल्ह्यात देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात आता महापालिकेच्या वतीने उपाय योजना केल्या जात आहेत. यात धूर फवारणीवर भर दिला जात आहे. यावर्षी जिल्ह्यात तसेच शहरात कोरोनाचा मोठा कहर राहिला. दोन हजार चारशे पेक्षा जास्त नागरिकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्येत लक्षणीय घट होत आहे. त्यामुळे व्यवहार आता सुरळीत सुरु झाले आहेत. असे असताना आता लातूरकरांना डेंगीचा सामना करावा लागत आहे.

ग्रामीण भागात डेंगीला आवर-
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागात डेंगीने तोंड वर काढताच उपाययोजनांवर भर दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी ग्रामपंचायतींना पत्र देऊन धूर फवारणी व अॅबेटींग करण्याचे आदेश दिले. अॅबेटींग व धूर फवारणीसाठी आरोग्य विभागाकडे मुबलक प्रमाणात औषधांचा साठा होता. त्याचे तातडीने वितरण ग्रामपंचायतींना करण्यात आले. मागील आठवड्यात अॅबेटींग व धूर फवारणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्याचा परिणाम दिसून आला. मागील आठवड्यात डेंगीचा रूग्ण आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर. आर. शेख यांनी दिली. मागील आठवड्यात ३६ रुग्णांच्या तपासणीत आठ रूग्ण आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरात चार झोन आहेत. महापालिकेकडे अठरा धूर फवारणी मशिन आहेत. गेल्या आठवड्यात प्रत्येक प्रभागात एकाच ठिकाणी चार- चार मशिन देवून फवारणी केली गेली. धूर फवारणीचा कार्यक्रमच तयार करण्यात आला आहे. दररोज ही फवारणी केली जात आहे. तसेच स्प्रेईंगच्या माध्यमातून देखील फवारणी
सुरु आहे.
-कलिम शेख, प्रमुख स्वच्छता निरीक्षक, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Visakhapatnam: स्टील प्लांटमध्ये मोठा अपघात! वितळलेलं स्टील कामगारांच्या अंगावर पडलं; ८ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

IND vs AFG: भारताविरुद्ध आऊट नसतानाही अफगाणिस्तानचा खेळाडूनं सोडलं मैदान अन् मग संघसहकाऱ्यांशीस झाला वाद; नेमकं प्रकरण काय?

Strait of Hormuz: होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ जहाजावर भीषण हल्ला! २४ भारतीय नाविक संकटात; बचावासाठी टाहो

Social Initiative: प्राध्यापक दांपत्याचा आहेराला नकार, वास्तुशांतीत फक्त वह्यांचा आहेर; १०,८१६ वह्या गरीब विद्यार्थ्यांना वाटपाचा संकल्प

LPG सिलिंडर पुन्हा महागणार! केंद्र सरकारचे संकेत, वाढीमागचं कारणही स्पष्ट सांगितलं

SCROLL FOR NEXT