ST Bus sakal
मराठवाडा

Osmanabad : बसचे नियोजन कोलमडले, प्रवाशांचे हाल

दुरुस्तीचे साहित्य मिळेना उस्मानाबाद प्रवाशांची डोकेदुखी वाढली

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : एसटी महामंडळातील बसेस स्पेअरपार्ट्स अभावी रस्त्यातच बंद पडत आहेत. यामुळे प्रवासी वर्गाची डोकेदुखी वाढली आहे. स्पेअरपार्ट्स पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची देणी थकल्याने त्यांनी पुरवठा बंद केला असल्याची चर्चा महामंडळाच्या गोटात असून यावर बडे अधिकारी बोलायला तयार नाहीत.

कोरोना तसेच संपाच्या संकटावर मात करीत लालपरी पुन्हा जोमाने रस्त्यावरून धावली. आता पुन्हा एकदा एसटी महामंडळाची गाडी अडखळत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एसटी महामंडळाकडे सहा आगार आहेत. सहाही आगारात स्पेअरपार्टचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. विशेष म्हणजे यामुळे काही गाड्या रस्त्यातच बंद पडत आहेत. सर्व आगारांना लागणारा ऑईलचा पुरवठा एचपीसीएलसह काही अन्य कंपन्या करतात. मात्र त्यांची देणी मोठ्या प्रमाणात थकली आहेत. त्यामुळे पुरवठा बंद केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अगदी स्टेअरिंक ऑईल मिळणेही कठीण झाले आहे. शिवाय अनेक आरसी (रेट कॉन्ट्रॅक्ट) झालेले नाहीत. त्यामुळे स्पेअर पार्ट खरेदीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

बुकींगबाबात दुर्लक्ष

एखादी बसफेरी जर जाणार नसेल तर त्याची नोंद आॅनलाइनवरून काढणे अपेक्षित असते. गणेशोत्सवाच्या काळात काही गाड्या कोकणात पाठविल्या. मात्र उपलब्ध गाड्यानुसार नियोजन करण्यात आले नाही. अनेक आगारांनी आॅनलाइन गाड्या कायम ठेवल्या. प्रवाशांनी बुकींग केले. ऐन प्रवासाच्या दिवशी गाडी बंद असल्याचे समजले. अशा भोंगळ काराभारावर प्रवाशी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

गाड्या रस्त्यातच बंद पडण्याच्या घटना

गाड्या रस्त्यातच बंद पडल्याने प्रवाशी वर्गाची हेळसांड होत आहे. कळंब आगाराच्या काही बसेस आळेफाटा मार्गे मुंबईला जातात. मात्र मागील आठवड्यात या गाड्या पुणे जिल्ह्यातूनच माघारी आल्या. शिवाय पुण्याला जाणाऱ्या काही गाड्या ऐनवेळी गेल्या नाहीत. त्यामुळे आॅनलाइन बुकींग करणाऱ्या प्रवाशी वर्गाचा खोळंबा झाला. शनिवारी दुपारी एक वाजता कळंबहून उस्मानाबादला जाणारी एसीयाड बस देवधानोरा स्टॉपवर बंद पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT