भोकरदनमध्ये एसटी बसवर दगडफेक Sakal
मराठवाडा

एसटी संप : भोकरदनमध्ये एसटी बसवर दगडफेक

चालकाच्या कॅबिनची खिडकी फोडली

दीपक सोळंके

भोकरदन (जि. जालना) : एसटीच्या कामगारांच्या संपामुळे तब्बल महिन्याभरानंतर धावलेल्या एसटी महामंडळाच्या एका बसवर आज सोमवारी (ता.सहा) सकाळी 10 वाजेच्या सुमारास भोकरदन शहराजवळ अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नसली तरी चालकाच्या कॅबिनच्या खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलिनीकरण करा या प्रमुख मागणीसाठी मागील महिनाभरापासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. हा संप अजूनही पुर्णतः मिटला नसला तरी काही कर्मचारी आता कामावर हजर होतांना दिसत आहे. सोमवारी तब्बल महिन्यानंतर जाफ्राबाद आगाराची जाफ्राबाद-भोकरदन ही बस जाफ्राबाद येथून विरेगाव ते आन्वापाटीजवळ आली असता काही अज्ञातांनी बसवर दगडफेक केली. यात बस चालकाच्या कॅबिनच्या खिडकीच्या काचा फुटल्या. मात्र, सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. या प्रकरणी बसचे चालक राजू पांडुरंग बोराडे यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसमध्ये होते आठ प्रवाशी

महिन्यानंतर पहिल्यांदाच जाफ्राबाद आगारातुन धावलेल्या एसटी बसने जाफ्राबाद ते भोकरदन या बसमध्ये आठ प्रवाशी प्रवास करीत होते. अशी माहिती आगार प्रमुख श्री राजपूत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT