Coronavirus Effect Villages Blocks, Ausa 
मराठवाडा

गावचे रस्ते अडवले... पण फिरणाऱ्यांचे काय? संसर्गाचा धोका कायम

जलील पठाण

औसा (जि.लातूर) : कोरोना संक्रमित बाहेर गावांतील लोक आपल्या गावात येऊ नये म्हणून ग्रामीण भागासह औशातील अनेक रस्ते नागरिकांनी बंद केल्याचे पाहावयास दिसून येत आहे. यामुळे रस्ते तर बंद झाले मात्र गावात आणि गल्लोगल्ली, चौकाचौकांत बिनकामाचे फिरणारे दिसत आहेत. नुसते रस्ते अडवून नका तर बिनकामी फिरणाऱ्या पायालाही लगाम लावा अशी म्हणायची पाळी आली आहे. आडमार्गाने गावाबाहेर जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्याने विषाणू संसर्गाचा धोका कायम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.


कोरोना विषाणूने जगभरातील लोकांची झोप उडविली आहे. भारतातही या विषाणूने चांगलाच शिरकाव केला असून याला रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. अडचणीच्या काळात कुणीही उपाशी राहू नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरापर्यंत प्रशासन आणि दानशूर व्यक्तींनी सुरू ठेवला. तरीही लोकांनी घरात बसने सोडून गावभर फिरत असल्याचे दिसून आल्याने पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला, तरीही लोकांचा बाहेर पडणारा लोंढा कमी झालेला नाही. तालुक्यातील अनेक लोक मुंबई, पुण्याला कामासाठी गेलेले आहेत ते आता गावी परत येत असल्याने आणि परगावतील काही लोकही गावात येत असल्याचा कारणावरून गावागावातील रस्ते दगड, मुरुमाचे ढीग, लाकडे, काटे आदी आडवे टाकून बंद करण्यात आले आहेत. शहरातही अनेक गल्ल्यांचे रस्ते बंद करण्यात आले असले तरी बिनकामाचे लोकांचे बाहेर निघणे बंद झालेले नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका खऱ्या अर्थाने कमी होत आहे हे म्हणणे कठीण आहे.


चाकूरचे रस्ते बंद अन् नागरिक मात्र बाहेर
चाकूर (जि.लातूर) ः बाहेरील व्यक्ती येऊ नये व घरातील व्यक्ती बाहेर निघू नये, यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील सर्व रस्ते प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आले असून, पोलिसांच्या वतीने खडा पहारा दिला जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असतानाही अनेकजण विनाकारण घराच्या बाहेर फिरताना दिसत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने सर्व कुटुंबांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले असून सात हजार ९४४ व्यक्ती बाहेरजिल्ह्यांतून तालुक्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT