latur
latur 
मराठवाडा

देवाक् काळजी रे... माह्या...!

विकास गाढवे

लातूर : लातूर ते बार्शी रस्त्यावर हरंगुळ रेल्वेस्थानकापासून सुरू झालेल्या दुभाजकामुळे सातत्याने अपघात घडत होते. दुभाजक सुरू झाल्याची माहिती देणारा फलक व अन्य उपाययोजना नाही. यामुळे दुभाजक सुरू झाल्याचा अंदाज न आल्याने वाहने दुभाजकावरच जात होती. दररोज होणारे हे अपघात रोखण्यासाठी कोणी तरी शक्कल लढवून दुभाजक सुरू होण्याच्या ठिकाणीच  दगडाचा देव स्थापन केला आहे. यामुळे काही दिवसातच तेथील अपघात थांबले असून सध्या गाजत असलेल्या गायक - गीतकार अजय - अतुल यांच्या `देवाक् काळजी रे ..` या गीताची आठवण प्रवाशांना येत आहे. 

अनेक वर्षापासून लातूर ते बार्शी रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रश्न लटकला आहे. राष्ट्रीय महामार्ग होऊनही कलंक लागल्यागत रस्त्याला कोणी वालीच उरला नाही. अरूंद रस्त्यामुळे रस्त्यावरील प्रवास बिकट झाला आहे. यातच या रस्त्यावर काही वर्षापूर्वी हरंगुळ (ता. लातूर) येथील रेल्वेस्थानकापासून दुभाजक व पथदिव्यांची उभारणी झाली. कोट्यवधी रूपये खर्चून उभारण्यात आलेले हे पथदिवे काही दिवसच झळकले व बंद पडले. त्यानंतर काही दिवसाचा हा `शो` प्रवाशांच्या जीवावर बेतू लागला. दुभाजकामुळे रस्ता अरूंद झाला व त्यामुळे दुभाजकाला वाहने धडकू लागली. त्यावरील पथदिव्यांचे पोलही कोसळू लागली. दुभाजकाला धडकण्याचे प्रकार थांबल्यानंतर दुभाजक सुरू झाल्याच्या ठिकाणचे अपघात मात्र, सुरूच राहिले. लातूरकडे वेगाने येणाऱ्या वाहनांना दुभाजक सुरू झाल्याचा पटकन अंदाज यावा, असा फलक किंवा उपाययोजना तिथे उभारली गेली नाही. यामुळे वाहने सातत्याने दुभाजकावर चढून त्यांचे नुकसान होऊ लागले.

एकही वाहन या अपघातापासून सुटले नाही. वाहनांचे नुकसान होण्यासोबत अनेक प्रवाशीही यात जखमी झाले. अपघातामुळे तेथील पथदिवे एकानंतर एक मोडून गेले. मात्र, अपघात सुरूच राहिले. याला पायबंद घालण्यासाठी कोणी तरी शक्कल लढवली. दुभाजक सुरू होण्याच्या ठिकाणी शेंदूर फासून दगड लावले. यामुळे वाहनचालकाला देवाचे पटकन दर्शन घडून येत असून दुभाजकाचा अंदाज येऊ लागला आहे. यातूनच मागील काही दिवसापासून दुभाजकाजवळ होणारे अपघात थांबले आहेत. प्रशासनाने यासाठी काहीच उपाययोजना केली नाही. यामुळे अपघात रोखण्याची शेवटी देवालाच काळजी असल्याची भावना प्रवाशी व वाहनचालकांतून व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT