band 
मराठवाडा

कडक लॉकडाऊनची हिंगोलीत पहिल्याच दिवशी प्रचिती 

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता १४ दिवसांचे कडक लॉकडाउन गुरुवार (ता.सहा) सुरु झाले असून त्याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी गुरवारपासून जिल्ह्यात कडक लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून लॉकडाउन लागू केले असून ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाजीपाला आणि किराणा दुकानेही बंद राहणार आहेत. तर दुसरीकडे मात्र वंचितच्या कार्यकर्त्यांनी लॉकडाउन तोडण्यासाठी गुरुवारी सकाळी प्रयत्न केला. त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी पोलिस प्रशासनाच्या वतीने चेक पॉइंट लावण्यात आले आहेत. 

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई 
विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिला आहे. नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. या लॉकडाउनमध्ये भाजीपाला व किराणा दुकान हे तब्बल १४ दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. पहिल्याच दिवशी बाजारपेठेत शुकशुकाट पहावयास मिळाला. 

जिल्हा परिषदेत गुरुवारी शुकशुकाट 
जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबिनोद शर्मा यांना कोरोनाची बाधा झाल्याने प्रशासनाने तीन दिवस कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गुरुवारीदेखील कर्मचाऱ्यांनी भीतीपोटी कार्यालयात जाणे टाळले आहे. तर विभागप्रमुखांसह अन्य कर्मचारी क्वारंटाइन असल्याने जिल्हा परिषदेच्या विविध विभागात शुकशुकाट पहावयास मिळाला आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारपर्यंत कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तीन दिवस बंदची मुदत संपल्याने गुरुवारी नेहमीप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये कामकाज सुरु होणार होते. मात्र, विभागप्रमुखच सेनगाव तालुक्यातील कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत क्वारंटाइन असल्याचे पाहून आलेल्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीपोटी कार्यालयातून काढता पाय घेतला आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे केवळ आरोग्य विभागातील कर्मचारी सोडता, इतर विभागातही सन्नाटा पसरला होता. फार तर सेवक कार्यालयात हजर होते. काही विभागाचे कुलूपदेखील उघडले नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीत कधी नव्हे ते पहिल्यांदाच शुकशुकाट पाहवयास मिळल्याचे चित्र होते.

संपादन ः राजन मंगरुळकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT