Shikshan Darpan App esakal
मराठवाडा

Shikshan Darpan App : घंटो का काम अब मिनटों में! विद्यार्थ्यांचे मूल्यांकन आता मोबाइल application

सध्या एक हजार ८०० शाळांतील पाच हजार शिक्षक आणि नव्वद हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या पोर्टलचा वापर करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

धाराशिव : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, तंत्रज्ञानाची कास धरत जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने, शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन मोबाइल अप्लिकेशनद्वारे करण्यास सुरुवात केली. ‘शिक्षण दर्पण’ नावाच्या अप्लिकेशनद्वारे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला जात आहे. यात विद्यार्थ्यांची विषयनिहाय प्रगतीची नोंद वर्ग शिक्षक करतात. त्यामुळे पूर्वी ज्या कामाला तासन् तास जात होते ते काम आता काही मिनिटांत होत आहे.

विद्यार्थ्यांची शालेय शिक्षणात प्रगती व्हावी, असा या मागील उद्देश आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गात शिकवलेले विद्यार्थ्यांना कितपत अवगत होते, याचे मूल्यांकन मोबाइल ॲप व वेबपोर्टल वरून ऑनलाइन करता येते. सध्या एक हजार ८०० शाळांतील पाच हजार शिक्षक आणि नव्वद हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या पोर्टलचा वापर करीत आहेत. मे महिन्यापासून याच्या वापरास सुरुवात झाली. पुणे येथील शौर्य टेक्नोसॉफ्ट या खासगी कंपनीने या मोबाइल अप्लिकेशनची रचना केली आहे. धाराशिव जिल्ह्यात ‘शिक्षण दर्पण’ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ‘चांदा’ नावाने हे अप्लिकेशन कंपनीने तयार केले आहे.

हा आहे उपयोग

जिल्हा, तालुका, केंद्र पातळीवरील सर्व अधिकारी शाळेमध्ये जाऊन कोणत्याही विद्यार्थ्याचे मूल्यांकन घेऊन अचूक गुणवत्ता तपासू शकतात. मूल्यांकनाच्या आधारे शिक्षणाधिकारी, सर्व विश्लेषणांमार्फत उत्तम कामगिरी करणाऱ्या शाळा आणि साधारण कामगिरी करणाऱ्या शाळा सहज आणि योग्य पद्धतीने तपासू शकतात. वेबसाइटमध्ये जिल्ह्याचे विश्लेषण विविध आलेखांच्या साहाय्याने पाहता येते. विद्यार्थ्यांचे प्रगतीपत्रक आलेखांच्या साहाय्याने पाहता येते. आतापर्यंत १,८३१ शाळांची नोंदणी पोर्टलवर केली आहे. एकूण ५,०२९ शिक्षक असून, साधारण ९२,००० हजार जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंदणी करून शिक्षकांनी ह्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन नोंदविले आहे.

यातून विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षण मिळण्यास मोठी मदत झाली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढल्याचेही दिसून आले आहे. राज्यात फक्त आपल्या जिल्ह्यात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली. हे चालू करण्यास आम्हाला काही कारणाने वेळ लागला आहे. मात्र, आम्ही हे अॅप्लिकेशन वापरण्यास सुरुवात केली आहे.

— राहुल गुप्ता, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Election : भाजपमधून  26  बंडखोरांची हकालपट्टी; मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची कारवाई, सहा वर्षांसाठी पक्षातून केलं निलंबन

Whatsapp : पालकांसाठी खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅपची लपवा-छपवी संपणार; तुमची मुलं काय करतात, कुणाशी बोलतात सगळं कळणार, नवीन फीचर काय आहे पाहा

Leopard Attack : आईवडिलांसमोर चिमुकल्या हियांशला बिबट्याने उचलले; गोंदिया जिल्ह्यातील खडकीवर शोककळा

Video: आईचं काळीज बघा.. शहीद मुलाला थंडी लागू नये म्हणून पुतळ्याला पांघरते ब्लँकेट; वृद्ध आईचा व्हिडीओ व्हायरल

Megablock: मुंबईकरांचे होणार मेगाहाल! रेल्वे मार्गावरील ब्लॉकमुळे लोकलसेवा विस्कळीत, 'या' स्थानकांवरील थांबे बंद राहणार; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT