विद्यार्थ्याची आत्महत्या sakal
मराठवाडा

ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल न मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

राग मनात धरून अकरावीत शिक्षण घेणाऱ्या या मुलाने गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केली

सकाळ वृत्तसेवा

जातेगाव : ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन द्या अशी आई-वडिलांकडे मागणी केली. मात्र परिस्थिती हालाकीची असल्याने पालक आपल्या मुलाची ही इच्छा पूर्ण करू शकले नाहीत. त्यांनी पुढच्या वर्षी मोबाईल घेऊन देऊ असे सांगत मुलाची मनधरणी केली. मात्र याचा राग मनात धरून अकरावीत शिक्षण घेणाऱ्या या मुलाने गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केली. गुरुवार (ता २३) सकाळी ही घटना उघडकीस आली. महेश जालीदंर कासार (वय १७, रा.मनुबाई जवळा, ता.गेवराई) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

सध्या कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण सुरु केले आहे. महेश कासार हा अकरावीत कला शाखेचे शिक्षण घेत आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल मिळावा यासाठी त्याने आई-वडिलांकडे तगादा लावला होता. तर परिस्थितीमुळे मोबाईल घेणे शक्य नाही. बारावीला गेला की मोबाईल घेऊन देईल असे वडिलाने त्याला सांगितले होते मात्र मुलगा महेश ऐकत नव्हता. मंगळवारी (ता. २१) सायंकाळी रागाने तो घरातून बाहेर पडला.

कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो सापडला नाही. यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली होती. तोच गुरुवारी (ता. २३) महेश कासार याचा गेवराई-माजलगाव सीमेवर असलेल्या गोदावरी नदीवरील शेलगाव बंधाऱ्यात मृतदेह आढळून आला आणि त्याच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. गेल्या दीड वर्षांपासून शाळा-महाविद्यालये बंद असली तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तर सर्वसामान्य कुटुंबीय आपल्या पाल्यास ऑनलाइन शिक्षणासाठी नवीन मोबाईल घेऊ शकत नाहीत.

महेशने ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईलची मागणी केली मात्र ती पूर्ण न झाल्याने त्याने नदी पात्रात उडी मारून जीवनाचा शेवट केला अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. महेश ता.१९ रोजी बेपत्ता झाला होता. त्या संदर्भात तलवाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. घटनास्थळी माजलगाव ग्रामीणचे फौजदार डाबाडे, बीट अंमलदार भागवत शेलार, अविनाश चव्हाण यांनी पंचनामा करुन मृतदेह विच्छेदनासाठी माजलगावच्या रुग्णालयात पाठवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : हडपसर, मांजरी, फुरसुंगीत जोरदार पावसाला सुरुवात

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT