Jalna Accident News esakal
मराठवाडा

टेम्पोने धडक दिल्याने शाळकरी मुलगा जागीच ठार, नातेवाईकांनी फोडला हंबरडा

देवराज हा इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होता.

वसंत काळवणे

रोहिलागड (जि.जालना) : किनगाव चौफुली-बदनापूर रस्त्यावर किनगाववाडी गावाजवळ टेम्पोने शाळकरी मुलास धडक दिल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. किनगाववाडी येथील देवराज शंकर बमनावत (वय १३) हा इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. गावातून शेताकडे पायी जात असताना किनगाव चौफुलीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या टेंपोने जोराची धडक दिल्याने मुलगा जागीच ठार झाला. सदर घटनेनंतर काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनसाठी अंबड (Ambad) येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. (Student Died In Accident In Ambad Taluka Of Jalna)

सदर घटनेमुळे नातेवाईकानी हंबरडा फोडल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. देवराज हा शाळेत हुशार व मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने शालेय समिती व शिक्षकांना देखील अश्रू अनावर झाले. यावेळी घटनास्थळी गावकरी मोठा जमाव जमा झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT