Student 
मराठवाडा

गाव सोडले; पण दुष्काळ पाठ सोडेना

सुशील राऊत

औरंगाबाद - बुलडाणा जिल्ह्यातील छोटंसं रुईखेड गाव... घरी सात एकर शेती. तिच्यावरच पाच जणांच्या कुटुंबांची भिस्त; पण यंदा पाऊस नसल्यानं काही उगवलंच नाही. त्यातच आई-वडिलांनी आम्हा भावंडांना शिक्षणासाठी औरंगाबादला पाठवलं. वाटलं पार्टटाईम जॉब करून आपण आपला खर्च भागवू; मात्र इथं आमच्यासारखे अनेक. गाव सोडलं; पण दुष्काळ पाठ सोडायला तयार नाही, असे ओमदास सोनुने सांगत होता. शहरातील वसतिगृह किंवा इतर ठिकाणी किरायाच्या खोलीत राहणाऱ्या जवळपास सर्वच विद्यार्थ्यांची हीच स्थिती आहे. 

ओमदास म्हणाला, ‘‘यंदा वडिलांनी दीड लाखाचं कर्ज घेतलेलं आहे; परंतु पीकच आलं नाही तर ते कसं फेडावं? शिवाय येणाऱ्या हंगामात आता कोण कर्ज देईल? शिक्षणासाठी खर्च करावा, की घर खर्च भागवावा, या विवंचनेत आई-वडील आहेत; मात्र अजून आम्ही आशा सोडली नाही.’’ ओमदाससारखे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी शहरात आहेत. कुणी कंपनीत काम करतो; तर कुणाला ‘कमवा आणि शिका’ ही योजना आधार ठरत आहे.  

होस्टेलच्या भत्त्याचा आधार 
‘‘गावाकडून आले. दोन भावांसह आम्ही दोघी बहिणी अन्‌ आई-वडील असं सहा जणांचं कुटुंब. यात कमावणारे एकटे वडील. घरखर्च भागवून सर्वांना शिक्षणासाठी पैसे पुरविणे शक्‍य होत नाही. यामुळे मी होस्टेलकडून मिळणाऱ्या भत्त्यावरच शिक्षण व इतर खर्च भागवत आहे. अशा परिस्थितीत कठीण आहे; मात्र काटकसर करण्याची सवय लागली. आता उन्हाळी सुटीत काम शोधणार आहे. नक्कीच हे दिवस जातील,’’ असे बुलडाणा जिल्ह्यातील प्रणाली लोखंडे म्हणाली. 

कंपनीत काम करतो 
‘‘घरी केवळ दोन एकर शेती. दुष्काळामुळे उभं पीक वाळून गेलं. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्‍न आहे. त्यामुळे आई-वडील पैसे कुठून पाठवतील? म्हणून मी एका कंपनीत कामगार म्हणून पार्टटाईम काम करीत आहे. उन्हाळ्याच्या सुट्या संपेपर्यंत माझ्याकडे शिक्षणासाठी वर्षभर पुरतील एवढे पैसे या नोकरीतून येतील, असे सिल्लोड येथील हरिदास राऊत याने सांगितले. 

रात्री हॉटेलमध्ये काम 
यंदाचा दुष्काळ भीषण आहे. आमचं सात जणांचं कुटुंब. आम्हा भावंडांची शिक्षण घेण्याची मनोमन इच्छा आहे. यासाठी औरंगाबादला आलो. घरात मोठा असल्याने लहान भावाच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्यावरच. त्याचं आणि माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणापुढे हात न पसरता काम शोधलं. आता रात्री हॉटेलमध्ये काम करून माझं आणि भावाचं शिक्षण पूर्ण करीत आहे, असे हिंगोली जिल्ह्यातील उद्धव घाटे याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT