Nanded News 
मराठवाडा

Video : रक्षकानेच काढली विद्यार्थिनीची छेड, पुढे काय झाले? ते वाचाच

श्याम जाधव

नवीन नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात येऊन विद्यार्थिनींची छेड काढल्यानंतर सोमवारी (ता.१६ मार्च २०२०) त्या घटनेचे तीव्र पडसाद विद्यापीठात उमटले.  विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या समोर प्रशासनाचा विद्यार्थिनींसह विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला.

भाग्यनगर पोलीस स्टेशनचा कर्तव्यावर असणारा पोलीस कर्मचारी नितीन केंद्र याने रविवार (ता.१५ मार्च) रोजी विद्यापीठ परिसरात विद्यार्थिनीची छेड काढली होती. यावेळी मदतीला धावून आलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाने वाऱ्यावर सोडून आरोपी विरोधात कुठलीच भुमिका घेतली नाही.  याउलट मदतीला धावून आलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण पोलीसांनी अटक केली. मुलीच्या बाजूने उभे राहूनही विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांची बाजू घेतली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. 

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
विद्यापीठ परिसरात असुरक्षितता आणि विद्यापीठ प्रशासनाच्या उदासीन भुमिके विरोधात विद्यार्थ्यांनी सोमवारी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबीत करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. विद्यापीठ परिसरात विद्यार्थिनीची छेड काढली. ही बाब जबाबदार अधिकारी यांना कळवली असता मी बाहेरगावी आहे. मी येवू शकत नाही असे सांगण्यात आले, असे विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांना सांगितले. दरम्यान आरोपी विरोधात विद्यापीठ प्रशासनाने कुठलीच भुमिका घेतली नाही. उलट विद्यार्थिनीच्या मदतीला धावून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली तरी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांची बाजू घेतली नाही. 

सुरक्षेची जबाबदारी कोणाची?                                                                एवढा भयानक प्रकार घडलेला असताना प्रशासन केवळ बघ्याच्या भुमिकेत होते. यापूर्वी देखील अशा अनेक घटना विद्यापीठ परिसरात घडलेल्या आहेत.  मात्र प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे असा आरोप करत विद्यार्थ्यांनी जबाबदार अधिकारी तथा कुलसचिव यांना निलंबीत करण्याची मागणी केली. विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? असाही प्रश्न यावेळी विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला. दरम्यान कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र.कुलगुरू डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन यांनी विद्यार्थ्यांना शांत बसण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT