File photo 
मराठवाडा

अध्ययन निष्पत्तीत विद्यार्थी बनताहेत स्मार्ट, कसे ते बघाच

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : एकीकडे पब्जी, फ्री फायर आदींसारख्या अनेक आनलाइन गेममुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावतीच्या एलओ स्मार्ट क्यू अॅपमुळे विद्यार्थी दिवसेंदिवस स्मार्ट बनत आहेत. राज्यातील सुमारे सव्वा तीन लाख विद्यार्थ्यांनी या अॅपचा वापर केला असून, अध्ययन निष्पत्तीमध्ये विद्यार्थी अधिकाधिक निपुण होत आहेत.

विद्यार्थी व शिक्षकांचाही सहभाग
गत चार महिन्यापूर्वी १६ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांच्या हस्ते या अॅपचा शुभारंभ करण्यात आला होता. अल्पावधीतच तब्बल सव्वा तीन लक्ष विद्यार्थी व शिक्षकांनी या अॅपचा वापर केला आहे. एलओ स्मार्ट क्यू अॅपमध्ये इयत्ता तिसरी ते आठवी मधील मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास, विज्ञान व सामाजिक शास्त्रमधील तीन हजार पेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे. यामध्ये ७५ टक्के गुण प्राप्त झाल्यावर अभिनंदन सह प्रमाणपत्र प्राप्त होते. आतापर्यंत तीन लाख बावीस हजार ७९ विद्यार्थ्यांपैकी सुमारे एक लाख नऊ हजार १३ विद्यार्थ्यांनी ७५ टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.

मराठी विषयाला सर्वाधिक प्राधान्य
यामध्ये सर्वाधिक मराठी विषयात ६३ टक्के विद्यार्थ्यांनी ७५ टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. इंग्रजीत ६२ टक्के, विज्ञान ६० टक्के, पर्यावरणशास्त्र ५७ टक्के, गणित ५४ टक्के तर सामाजिक शास्त्र मध्ये ४५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के पेक्षा अधिक यश संपादन केले आहे. प्राचार्य डॉ. रवींद्र अंबेकर यांच्या मार्गदर्शनात ज्येष्ठ अधिव्याख्याता दीपक चंदुरे तसेच सर्व अधिव्याख्याता, विषय साधनव्यक्ती, विषय सहाय्यक यांच्या अथक परिश्रमातून या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

संपादणूक सर्वेक्षणात निकाल उंचावणार
दरवर्षी शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण होणार असून, ज्या वर्षी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण नसणार त्या वर्षी राज्य संपादणूक सर्वेक्षण होणार आहे. सोबतच राज्य शैक्षणिक मार्गदर्शन करिता टीव्ही चॅनेलसह अत्याधुनिक सॉफ्टवेअर विकसित होणार आहे. या माध्यमातून हे अॅप सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे निश्चितच निकास उंचावणार असा आशावाद प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे प्राचार्य डॉ. रवींद्र अंबेकर यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test: पडिक्कलने सलग दुसरं शतक करत ८ वर्षांचा दुष्काळ संपवला! शुभमन गिलचीही फिफ्टी, पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व

तरुणांच्या मुद्द्यावर CJP पुन्हा आक्रमक; केंद्राच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

SCROLL FOR NEXT