Hingoli News 
मराठवाडा

नृत्यातून आनंदी जीवन जगण्याचा विद्यार्थ्यांचा संदेश...  

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलने डान्स किड्स डान्स ऑनलाइन नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना संकटात आनंदी जीवन जगण्याचा संदेश दिला असून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाउन सुरु आहे. ज्ञानदान करणाऱ्या शाळा, कॉलेज आणि विद्यापीठ बंद आहेत. विद्यार्थ्यांना घराबाहेर जाता येत नाही, त्यामुळे चार भिंतीच्या बंदिस्त वातावरणात ते बंद आहेत. घराबाहेरचे वातावरण अस्वस्थ करणारे आहे. कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे. मन हेलावून टाकत आहे, त्यामुळे घरीच सुरक्षित राहणे आवश्यक आहे. मन अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीत आणि संघर्षमय कालावधीत पोद्दार इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची नवी प्रेरणा, नवी उमेद आणि नवे विचार मिळावेत यासाठी नवीन उपक्रम सुरू केले आहेत.  

हेही वाचा - धक्कादायक : हिंगोलीत चार महिन्याच्या बालकासह आठ जण कोरोनाबाधित

चित्रकला, संगीत, नृत्य, पुस्तक वाचन उपक्रम
संघर्षमय वातावरणातही रडत न बसता स्वतःच्या आत्मविश्वासाने संकटावर मात करावी. संघर्ष करावा, संकटाचा सामना करावा, लॉकडाउन कालावधीत विविध सृजनशील उपक्रम सुरु केले आहेत. यात चित्रकला, संगीत, नृत्य, पुस्तक वाचन आणि क्रिडा या सारखे विविध उपक्रम सुरु केले आहेत. या बाबत प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज म्हणाले, विद्यार्थ्यांनी विविध कला आणि छंद जोपासून आनंदी जीवन जगण्याचा मार्ग शोधावा. यासाठी सुरू असलेल्या उपक्रमात विद्यार्थी सहभागी होत आहेत. सध्या डान्स किड्स डान्स ऑनलाइन नृत्य स्पर्धेस विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे ते म्‍हणाले.

हेही वाचा - लॉकडाउनचा फटका : किरायदार निघून गेल्याने घरमालक भाडेकरूंच्या शोधात -

तीनशे विद्यार्थ्यांचा सहभाग
नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कोरोना संकटात आंनदी जीवन जगण्याचा संदेश दिला. यात विद्यार्थ्यांनी बालगीत, देशभक्ती, धार्मिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या गीतावर मनमोहक आणि सुंदर नृत्य केले. जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. विविध गीतांवर सुंदर आणि मनमोहक नृत्य करून त्याचे डान्स व्हिडिओ शाळेला पाठवले होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी शाळेतील नृत्यशिक्षक संतोष दिपके, मोहिनी दीक्षित यासह सर्व शिक्षकांनी पुढाकार घेतला.

विद्यार्थ्यांनी विविध कला आणि छंद जोपासावे
विद्यार्थ्यांनी विविध कला आणि छंद जोपासून आनंदी जीवन जगण्याचा मार्ग शोधावा. नृत्य करताना शारीरिक क्रियाकल्प होत असतात, आत्मविश्वास वाढतो, रक्त अभिसरण प्रक्रिया सुधारते, मांसपेशी मजबूत होतात, वजन वाढते मन:शांती, एकाग्रता, चपळता, तंदुरुस्ती आणि निरोगी राहण्यास मदत होत असल्याचे प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! खडकवासला धरण ८१% भरले; कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात

Konkan Pune Highway : कोकण-पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क तुटला! ताम्हिणी, भोर अन् आंबेनळी घाट बंद झाल्याने चाकरमान्यांवर मोठे संकट; शेकडो किलोमीटरचा मारावा लागणार वळसा!

Krishna River Flood : कोल्हापूर-सांगलीत मुसळधार! नृसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसरात पूरस्थिती; पाहा यंदाचा पहिला 'दक्षिण द्वार सोहळा', भाविकांची अलोट गर्दी

IND vs ENG, 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचा फलंदाजी क्रमांक बदलणार, तर बिश्नोई संघातून आऊट? कशी असू शकते भारताची प्लेइंग-११

Pune Solapur Highway: २१ कोटींचा रस्ता पुन्हा उखडला! पालखीला अवघे तीन दिवस; पुणे-सोलापूर महामार्गावर खडी, खड्डे अन् अपघातांचा धोका..

SCROLL FOR NEXT