file photo 
मराठवाडा

राज्य सेवा परीक्षा रद्द केल्याच्या निषेधार्थ परभणीतही विद्यार्थांचा ठिय्या

गणेश पांडे

परभणी ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा परीक्षा रद्द केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी गुरुवारी (ता. 11) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. परीक्षा नियोजित तारखेलाच घेण्यात याव्यात असी मागणी या विद्यार्थांनी लावून धरली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी राज्य सेवा परीक्षा ता. 14 मार्च रोजी होणार होती. या परीक्षांचे प्रवेश पत्र देखील विद्यार्थांना वितरित करण्यात आलेले आहेत. परंतू गुरुवारी (ता. 11) राज्य शासनाने कोरोनाचे कारण समोर करून अचानकपणे या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे स्पर्धा परीक्षाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संतप्त विद्यार्थांनी याचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. शेकडोच्या संख्येने विद्यार्थी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमल्याने पोलिसांसह प्रशासनाचीही भांबेरी उडाली. ही परीक्षा अचानक रद्द केल्याने विद्यार्थामध्ये संताप वाढला असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी ठिय्या आंदोलनास बसलेल्या विद्यार्थांनी व्यक्त केल्या.

राज्य सेवा 2019 ही परीक्षा नियोजित तारखेलाच म्हणजे ता. 14 मार्च रोजी घेण्यात यावी, महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा, नोकर भरती परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पारदर्शक पध्दतीने घेण्यात याव्यात, ता. 28 फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाच्या परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याने ती परीक्षा रद्द करावी, मागील झालेल्या महापरीक्षेच्या माध्यमातून झालेल्या सर्व परीक्षांची चौकशी करण्यात यावी, शासनाच्या सेवेतील असलेले रिक्त पदे तातडीने भरण्यात यावेत या मागण्या आंदोलक विद्यार्थांनी केल्या होत्या.

अन्यथा विद्यार्थांचा उद्रेकास सामोरे जावे लागेल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा परीक्षा पूर्व नियोजित तारखेलाच घ्यावी. राज्यातील विद्यार्थांवर होणारा अन्याय दुर करावा अन्यथा विद्यार्थाच्या उद्रेकास सामोरे जावे लागेल असा इशारा या विद्यार्थांनी दिला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT